Download App

Sangali : बाजार समितीची निवडणूक अन् जयंत पाटील कट्टर विरोधकासोबत…

Market Committee Election Sangali : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तैयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत.

अनेक ठिकाणी मात्र बाजार समित्यांमध्ये ऐनकेन प्रकारे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं त्यासाठी कट्टर विरोधकही एकत्र येताना पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय आला तो सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंत पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्या एकत्र येण्याने.

आमदार पाचपुतेंना पुन्हा पुतण्याने आणले टेन्शन; आता बाजार समितीत विरोधात

या दोन कुटुंबांमध्ये दोन पिढ्यांच्या राजकीय संघर्ष पाहायला मिळालेला आहे. मात्र बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याने दक्षिण महाराष्ट्रामध्ये चर्चांना उधान आले आहे. तर एवढेच काय सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जयंत पाटील यांनी विशाल पाटलांशी चर्चा केली आहे. दरम्यान बाजार समितीच्या 18 जागांपैकी काँग्रेसला 9, राष्ट्रवादीला 8 व शिवसेनेला 1 जागा मिळली आहे.

मात्र अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर युती करणाऱ्यांवर पक्षाकडूवन कारवाई देखील करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं. याचं उदाहरण म्हणजे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी मोठा डाव टाकला आहे. ऐन बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष भाजपसोबत आला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. याची राष्ट्रवादीने गांभीर्याने दखल घेतली आहे. ऐनवेळी पक्षाला दगा देणारे काकासाहेब तापकीर यांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Tags

follow us