Download App

Deepak Kesarkar : ‘आम्ही कधीच एकमेकांवर व्यक्तिगत टीका केली नाही’

Deepak Kesarkar News : मी नारायण राणे यांच्यावर कधीच व्यक्तिगत टीका केली नाही’ असं स्पष्टीकरण देत ही सदिच्छा भेट असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar)</strong> यांनी म्हटलं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोन कट्टर विरोधी राणे आणि केसरकरांना मानलं जातं. अशातच दीपक केसरकरांनी नूकतीच नारायण राणे यांच्या कणकवलीच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत तब्बल दीड तास चर्चाही केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर ही सदिच्छा भेट असल्याचं सूर केसरकरांनी लावल्याचं पाहायला मिळालं. केसरकरांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला.

अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा! शेअर केले जोडीदारासोबतचे खास फोटोज

दीपक केसरकर म्हणाले, नारायण राणे आणि माझी सदिच्छा भेट होती. मी कधीच नारायण राणे यांच्यावर व्यक्तिगत टीका केलेली नाही. काही विषयांवर मी टीका केलेली आहे, पण व्यक्तिगत टीका आम्ही कधीच एकमेकांवर केलेली नसल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राजकारणातले दोन वैरी काल तब्बल 12 वर्षानंतर एकाच छताखाली आल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदूर्ग जिल्ह्यातले दोन कट्टर स्पर्धक केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज एकत्र आले. केसरकरांनी राणे यांच्या कणकवलीच्या निवासस्थानी भेट घेत तब्बल दीड तास चर्चा केलीयं. राजकारणातल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये दोन कट्टर स्पर्धेक पहिल्यांदाच एकत्र येत दीड तास चर्चा केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दोन्ही नेत्यांच्या या भेटीचीच राजकारणात चांगलीच चर्चा सुरु झाली.

जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच राणे-केसरकर यांच्यात वाद उफाळून आला. या वादानंतर 2009 साली दीपक केसरकरांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभेत गेले. पवारांच्या सांगण्यावरुन राणेंनी या निवडणुकीत केसरकरांना मदत केल्याचं या निवडणुकीत बोललं जात होतं. माझ्या मदतीनेच दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून निवडून आले असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे जिल्ह्यात राणे कुटुंबियांकडून नेहमीच दहशतवाद करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केल्याचं पाहायला मिळालं.

लोकसभेच्या आखणीत ठाकरेंची सावध पावलं : पवारांशी मैत्री जपण्यासाठी दोन ‘विश्वासूंवर’ खास जबाबदारी

राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर दीपक केसरकरांनी शिवसेनेत उडी घेतली. एकेकाळी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून दोन्ही नेत्यांची ओळख. एकाच पक्षात असूनही दोन्ही नेत्यांमध्ये वाद होता. भाजप-शिंदे गटाची युती होताच राज्यातील अनेक नेत्यांनी वाद मिटवून घेतले मात्र, या दोन्ही नेत्यांमधील वाद काही मिटल्याचं दिसलं नव्हतं. या काळात राणे कुटुंबियांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

डीएड बेरोजगारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. या भेटीत बेरोजगारांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतरच नारायण राणे यांच्या निवासस्थानी दीपक केसरकरांनी धाव घेत भेट घेतली. डीएड बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी आज नारायण राणेंची भेट घेतली असून ही राजकीय भेट नाही. अनेकदा मार्गदर्शनासाठी राणे यांनी भेटत असतो, एक अनुभवी नेते म्हणून ते नेहमीच मार्गदर्शन करीत असल्याचं मंत्री दीपक केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.

Tags

follow us