Girish Mahajan : राज्यातील राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते विजयाचे दावे करत आहेत. आता राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (Girirsh Mahajan) यांनी विरोधी महाविकास आघाडीला टोचणारा दावा केला आहे.
महाजन (Girish Mahajan) म्हणाले, काँग्रेस किती लढतील आणि किती जिंकतील हे वेळच सांगेल. मी आधीच सांगितलं आम्ही 48 जागा जिंकणार आहोत. मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो. माझ्या सांगण्यात चूक होत नाही. मी पुन्हा सांगेल की आऊटऑफ 48, एकही जागा आम्ही हरणार नाही. काँग्रेस सांगते आम्ही 32 जागा जिंकू. मात्र हा मोठा विनोद आहे. वास्तवता जे आहे ते बोललं पाहिजे. मी कधीही अवास्तव बोलत नाही.
विखेंना शह देण्यासाठी ठाकरेंचा नगर दौरा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार पाहणी
मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर भाष्य करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरे हेच दोषी आहेत. वटहुकूम काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरातूनही बाहेर निघाले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधक आपली राजकीय पोळी भाजू घेत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी यावेळी केली.
दरम्यान, मंत्री महाजन यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा दावा विरोधकांना झोंबणार हे नक्कीच. आता त्यांच्या या दाव्यावर विरोधी पक्षांचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.