स्मार्ट मीटरचा मंत्री गुलाबराव पाटील यांनाही झटका, घरचे वीज बिल 5 हजारांवरून थेट 20 हजारांवर

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात होत असलेल्या अनपेक्षित वाढीमागील कारणांचा तपास करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

News Photo   2026 07 28T193156.528

स्मार्ट मीटरचा मंत्री गुलाबराव पाटील यांनाही झटका, घरचे वीज बिल 5 हजारांवरून थेट 20 हजारांवर

स्मार्ट मीटरमुळं राज्यभरात वीज बिलात (Smart Meter) अचानक वाढ झाल्याची तक्रार हजारो ग्राहकांकडून सातत्यानं करत आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनाही या स्मार्ट मीटरचा शॉक बसला आहे. यापूर्वी त्यांच्या घराचे मासिक वीज बील 5 हजार रुपयांच्या दरम्यान येत होते, मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ते आता 20 हजार रुपयांवर आले आहे.

गुलाबरांनी आपल्या घराचे मासिक वीज बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल २० हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे सोमवारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच एमव्हीए क्षमतेच्या अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या घरातील वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पाटील म्हणाले, एक विनंती आहे की, तुमचे स्मार्ट मीटर आमच्यावर लयी प्रेम करतंय ते सांभाळा. केवळ माझ्या निवासस्थानीच नाही तर तर मतदारसंघातील अनेक ग्राहकांचेही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाली आहे. लोक माझ्या घरी तक्रारी घेऊन येत आहेत. स्मार्ट मीटर बसवताना ते स्वच्छेने बसवा असा सल्ला गुलाबरावांनी दिला.

स्मार्ट मीटरमध्ये खरचं कॅमेरा आहे का? महावितरणाचा थेट कारवाईचा इशारा

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात होत असलेल्या अनपेक्षित वाढीमागील कारणांचा तपास करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. आता तर पालकमंत्र्यांच्याच निवासस्थानाचे वीज बिल नेहमीपेक्षा तब्बल चौपट पटीने वाढल्याने स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सरकारमध्ये मंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांनी अशा प्रकारे सार्वजनिकपणे वाढीव बिलाबाबत नाराजी व्यक्त केल्याने या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असून यांदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.

यामध्ये महत्वाची बाब म्हणजे, यापूर्वी स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या चर्चा व तक्रारींवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं होतं. स्मार्ट मीटरमुळं अचूक बिलिंग होईल, दिवसा वीज वापरासाठी सवलती मिळतील आणि ग्राहकांचं वीज बिल कमी होईल, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळं नागरिकांनी निर्धास्तपणे स्मार्ट मीटर बसवावेत, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

Exit mobile version