Download App

Hasan Mushrif : ..तर आम्ही मंत्रिपदाचे राजीनामे देऊ; राऊतांविरोधात मुश्रीफ मैदानात

Hasan Mushrif : राज्यात मराठा आरक्षणावर अद्याप (Maratha Reservation) अंतिम तोडगा काढण्यास राज्य सरकारला यश आलेले नाही. आरक्षण देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत असून भुजबळांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला थेट विरोध केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर होत असून जोरदार भांडणं होत आहेत. आगामी बैठकांमध्ये एक-दोन मंत्री मार खातील एवढेच नव्हे तर मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून जात आहे एवढे वातावरण खराब झाले आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकारणात उमटू लागले आहेत. वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी संजय राऊतांना थेट आव्हान दिल आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारण्यात आले. त्यावर मुश्रीफ म्हणाले, मंत्रिमंडळात कोणताही वाद झालेला नाही. ही चुकीची माहिती आहे. फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी सामंजस्याने बोलावं अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. एकमेकांवर धावून गेल्याचं जर संजय राऊत म्हणत असतील आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर आम्ही मंत्रिपदाचे राजीनामे देऊ.

Girish Mahajan : ‘संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा’ ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला

काय म्हणाले होते संजय राऊत ?

या महाराष्ट्रामध्ये कमजोर व अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना भाजपसह कोणीच जुमानत नाही. कॅबिनेटमध्ये गॅंगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर होत असून जोरदार भांडणं होत आहेत. आगामी बैठकांमध्ये एक-दोन मंत्री मार खातील एवढेच नव्हे तर मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून जात आहे एवढे वातावरण खराब झाले आहे

Tags

follow us