उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आयत्या बिळावरचा नागोबा असल्याची जळजळीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी केली आहे. सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंबियांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. आत्ताही पुन्हा एकदा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नारायण राणे म्हणाले, आम्ही कोणाला घाबरत नाही, असं ठाकरे सांगताहेत पण शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी उद्धव ठाकरेंनी कधी कोनाच्या कानाखाली मारली आहे का? मराठी माणसासाठी कधी आंदोलनात सहभाग घेतलायं का? असा सवाल करीत हा आयत्या बिळावरचा नागोबा असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत.
Naseeruddin शाहांच्या वक्तव्यावर नाना पाटेकरांनी सुनावलं; म्हणाले, ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली…’
तसेच आमचे विरोधक चांगल्याला चांगलं म्हणायचा मोठेपणा दाखवत नाहीत. उद्धव ठाकरेंचे सध्या महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत, मुख्यमंत्री असताना ते कधी मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते आता फिरताहेत. उद्धव ठाकरेला चांगलं बोलता येत नाही. राज्यातील प्रश्न सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच बोलतात, एकनाथ शिंदे गद्दार तर मग उद्धव कोण आहे? असा सवालही राणे यांनी केला आहे.
पोटात एक आणि ओठात एक हा तुमचा स्वभाव, आजोबांची पूर्ण हयात…; भाजपची आदित्य ठाकरेंवर टीका
बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत कधीच तडजोड केली नाही, पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे, ज्या शरद पवारांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली त्यांच्यासोबत युती करुन सत्ता स्थापन केली असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेचं मराठी माणसासाठी योगदान काय आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने सुरक्षा घेताहेत अन् म्हणतात आम्ही कोणाला घाबरत नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसाठी आत्तापर्यंत काय केलं? ते नेहमीच एकनाथ शिंदेंची चेष्टा करीत आहेत, उद्धव ठाकरे घरात पत्नीशी ब्रिटीश इंग्रजी बोलत असल्याची टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.