मुंबईः राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे.त्यात आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंत्री देसाई यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. तीन दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. देसाई हे अनेक आमदार व मंत्र्यांच्या संपर्कात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
शंभूराज देसाई यांनी याबाबत ट्वीट केले आहे. देसाई हे सध्या गृहविलगीकरणात असून, डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे. काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या चार दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी काही लक्षणे आढळल्यास कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देसाई यांनी ट्वीटमध्ये केले आहे.
बावनकुळे हे वर्षभर घरीच जाणार नाहीत; हर्षवर्धन पाटलांनी सांगितले नियोजन
गेल्या आठवड्यात राज्याची अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले आहे. देसाई हे सभागृहात व सभागृहाबाहेर अनेकांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे आमदार, मंत्री, अधिकारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. तेही घरीच उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नंदूरबार, अहमदनगर जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने खबरीदारीचे उपाय सूचविले आहे
https://www.youtube.com/watch?v=usfXieI_Xeo