Shambhuraj Desai On Thackeray Group : फ्रीज भरुन कुठं काय जात होतं हे सांगण्याची वेळ आणू नका, नाहीतर आम्हाला सगळं उघड करावं लागणार असल्याचं म्हणत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सुनावलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी एकनाथ शिंदे हे पाकीट घरी घेऊन जाणारे नाहीतर पोहोचवणारे होते, असं म्हणाले. त्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत शिंदेंना पाकीट कुठून यायंच हे विचारा, असं उपरोधिक विधान केलं होतं. दानवेंच्या विधानावरही देसाईंनी परखड भाष्य केलं आहे.
Kiran Mane: किरण मानेंची अभिनेत्रीबद्दलची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “इतर कलाकारांपेक्षा सोनालीने…”
शंभूराज देसाई म्हणाले, अंबादास दानवे तेव्हा तुम्ही त्यावेळी खूप दूर होतात. फ्रीज भरुन कुठं काय जात होतं हे सांगायची वेळ आणू नका. कुठले फ्रीज होते? किती काळ टिकणारं साहित्य त्यात होतं? काय साहित्य होतं? हे सगळं आम्हाला उघड करावं लागेल, असा दम शंभूराज देसाई यांनी भरला आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमातील सोनू निगमच्या आवाजातील ‘मस्तीची सफर…’ गाणे प्रदर्शित
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोकणात अतिवृष्टी, शेतकरी संकटात असताना तत्कालीन सरकारचे मंत्रीच अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पाहणी करीत होते. स्वत; उद्धव ठाकरे कधीच पाहणी करण्यासाठी गेलेले नाहीत, स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असं उद्धव करत असल्याचं टीकास्त्र शंभूराज देसाईंनी सोडलं आहे.
Bhalchandra Nemade यांची ‘कोसला’ झळकणार पडद्यावर; ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
तसेच मी माध्यमांवर ऐकलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत, जर उद्धव ठाकरे अशा पद्धतीने मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत असतील तर आम्हालासुद्धा नाईलाजास्तव बोलावं लागणार हे तुम्हाला सांगावं लागत, असल्याचंही देसाईंनी स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं. यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदील झाला. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं सोडून स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढावलेले असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज कशी नाही वाटत? उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरही टीकेची तोफ डागली.