Download App

Shambhuraj Desai : ‘हवेत तीर मारू नका, पुरावे द्या!’; देसाई पटोलेंवर बरसले

Shambhuraj Desai : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मागील काही दिवसांपासून सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. कालही त्यांनी सध्याच्या सरकारमध्ये घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी गटातील नेते चांगलेच बिघडले आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कुठला घोडा, कुठला बाजार ते पटोले यांनी पुढे येऊन सांगावं. हवेत तीर मारण्याचे काम बंद करा असा टोला देसाईंनी लगावला.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील स्मृतीस्थळी मंत्री देसाई यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले. त्यावर देसाई यांनी पटोलेंना थेट आव्हान दिले. पटोलेंनी हवेत बोलू नये पुरावे द्यावेत. त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते त्यांनी उघड करावेत. माहिती असेल तर कॅमेऱ्यासमोर येऊन सांगावं. नुसताच घोडेबाजार चाललाय असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. उगाच हवेत तीर मारायतचा आणि भडक बोलायचे हे आता चालणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला.

Nana Patole : ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची भूमिका काय? नाना पटोलेंनी सांगून टाकलं

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान लाठीचार्ज झाला होता. या प्रकरणात राज्य सरकारने जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना निलंबित केले होते. आता त्यांची बदली लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. सत्ताधारी पक्षातील नेत्यांवरही त्यांनीद जोरदार टीका केली होती.

Tags

follow us