Download App

‘मराठा आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात पण..,’; शंभूराज देसाईंचं सूचक विधान

Shambhuraj Desai Speak on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे, पण कायमस्वरुपी आरक्षण हवं असेल तर थोडा वेळ वाढवून दिला पाहिजे, असं सूचक विधान मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आता उपोषण सोडण्यासाठी कोणाचंही ऐकणार नसल्याचा पवित्रा मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे. त्यावरच बोलताना शंभूराज देसाई यांनी ही भूमिका मांडली आहे.

‘विरोधात बसून टोमणे मारुन काही होत नाही’; Prafulla Patle यांचा रोहित पवारांना टोमणा

शंभूराज देसाई म्हणाले, मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण हवं असेल तर मनोज जरांगे यांनी आणखी थोडा वेळ वाढवून दिला पाहिजे. कारण मराठा आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आलायं. आपल्याला कायदेशीर बाब समजून घ्यायला पाहिजे, फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात दीड वर्षे टिकलं. मराठा आरक्षण समितीची संपूर्ण माहिती एकनाथ शिंदे घेत आहेत.

जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा एल्गार! गिरीश महाजनांची अखरेच्या क्षणापर्यंतची शिष्टाई निष्फळ

बैठकीत काय निर्णय झाला? कशापद्धतीने तो निर्णय पुढे चालला आहे? काहीही झालं तर आपल्याला कायमस्वरुपी आरक्षण मिळणार, अशा पद्धतीने बारकाईने एकनाथ शिंदेंचं याकडे लक्ष आहे. इतक्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. त्यासाठी मर्यादित कालावधीही निश्चित करून दिला असल्याचंही देसाई यांनी सांगितलं आहे.

दिल्लीवरुन निर्णयच घेऊन या…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या हाय कमांड नेत्यांशी सविस्तरपणे चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीसांनी मराठा आरक्षण देण्याचा निर्णयच घेऊन राज्यात यावं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Animal : टाइम्स स्क्वेअरवर झळकला अ‍ॅनिमल; टीझरने जगभरातील चाहते मंत्रमुग्ध

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला असून त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्नभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत काल (24 ऑक्टोबर) संपली.

जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाचा जीआर घेऊन येत नाही तोपर्यंत शासनातील कोणाशीही संवाद साधणार नसल्याच सांगितलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करत असल्याचही त्यांनी सांगितलं. कोणी नेता आला तर त्याला शांततेत परत पाठवा, कुठेही दंगा करु नका. उग्र आंदोलन, जाळपोळ होणार नाही याची काळजी घ्या. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन यावेळी त्यांनी मराठा समाजाला केले.

Tags

follow us