खैरे साहेब तुम्ही मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका, मंत्री सामंतांनी लगावला टोला

Minister Uday Samanat Speek On Chandrakant Khaire : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा समोर आला आहे. दरम्यान यानंतर आता नेतेमंडळींकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यातच ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. यावर आता सामंत यांनी देखील उत्तर दिले आहे. खैरे यांनी मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये, […]

Untitled Design   2023 05 11T152353.815

Untitled Design 2023 05 11T152353.815

Minister Uday Samanat Speek On Chandrakant Khaire : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा समोर आला आहे. दरम्यान यानंतर आता नेतेमंडळींकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यातच ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. यावर आता सामंत यांनी देखील उत्तर दिले आहे. खैरे यांनी मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये, असा खोचक टोला सामंत यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत
ठाकरे गटाचे काही आमदार व काँग्रेसचे काही आमदार हे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया द्यायची म्हणून ठाकरे गटाचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली. यावर बोलताना सामंत म्हणाले, सन्मानीय खैरे साहेब उद्धव ठाकरे काम करत नाही हे सांगण्यासाठी तुम्ही अनेकदा एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर आढळून आले आहे.

Video : तुम्ही नैतिकतेवर बोलूच नका, फडणवीसांनी ठाकरेंना फटकारले

मी शरद पवार यांना भेटलो मात्र मी जाहीरपणे भेटतो. मी एखाद्याला जेव्हा भेटतो तेव्हा त्याबाबत जाहीरपणे पत्रकारांसमोर भेटतो. मात्र तुम्ही नंदनवन मध्ये येत उद्धव ठाकरे कसे काम करत नाही. तसेच निधी मिळण्यात कशा अडचणी येतात हे सांगायला मुख्यमंत्र्यांच्या नंदणवन बंगल्यावर यायचे असेही सामंत म्हणाले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पुन्हा काढली अजित पवारांची खोडी

पुढे बोलताना सामंत म्हणाले, जर मी ठाकरे यांच्या संपर्कमध्ये आहे याबाबतचे पुरावे चंद्रकांत खैरे यांनी द्यावेत. अन्यथा मी नंदनवन बंगल्यावर खैरे येत असत याचे पुरावे देतो, अशा शब्दात एकप्रकारे मंत्री उदय सामंत यांनी थेट खैरे यांना इशाराच दिला आहे.

Exit mobile version