Aditya Thackeray on Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या 16 दिवसांपासून उपोषणा करत आहे. त्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण बोलून मोकळं व्हायचं, असं म्हणतांना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. हा व्हिडिओ खरा असेल तर सरकारला महागात पडेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.
आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिलं की, “बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्यच मुख्यमंत्री. ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशीलता? खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतो आहे, या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच, पण, देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
"बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!" – घटनाबाह्य मुख्यमंत्री
ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता?
खरतर हीच ती गद्दार वृत्ती!गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतंय.
ह्या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक… https://t.co/plaQxLHyut— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2023
त्यांनी पुढं लिहिलं की, तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्रीपदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार? दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लांदलं गेलंय, असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं. यांनी केलं.
नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदे जे काही बोलले तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात सीएम शिंदे म्हणतात, आपल्याला काय बोलायचं अन् निघून जायचं? बोलून मोकळं व्हायचं…. यावर अजित पवारांनी हो…येस, असा प्रतिसादही दिला. हा संवाद सुरू असतांनाच फडणवीस यांनी सीएम शिंदेच्या कानात माईक सुरू आहे, असं सांगतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारव टीकेची झोड उठवली जाते.
जीवघेणा निपाह व्हायरस होतो तरी कसा? व्हायरस किती धोकादायक? जाणून घ्या लक्षणं…
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून सरकारवर टीका केली आहे. सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत, नाकर्ते सरकार राज्यात कारभार हाकत आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंनीही जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.