Ajit Pawar News : मुख्यमंत्रिपदाबाबत बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही, या शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केलायं. राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार शाब्दिक चकमक सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच अजित पवारांना मुख्यमंत्री करा, असं रोहित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना अजित पवार यांनी पलटवार केलायं.
अमोल खताळांच्या मागून कोणीतरी बोलतंय; गंभीर आरोपांवर बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्रिपदाबाबत बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही आम्ही आणि आमचा पक्ष, आमदार कार्यकर्ते थांबलेले आहेत, असा पलटवार अजित पवारांनी पुतण्यावर केला आहे. निकाल लागून फक्त तीन दिवस झाले आहेत, अजून कशातच काही नाही. मात्र, काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या संपर्कात कोणीही नाही, निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतली, त्यात आमच्या पराभूत आमदारांचा देखील समावेश होता. त्यांचे मन जाणून घेतलं, तसेच निवडून आलेल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन जनतेचं आभार मानायचं सांगितल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत.
दुचाकी चालकांसाठी नवा नियम! आता दोघांना हेल्मेट सक्ती, नियम मोडणाऱ्यावर होणार ‘ही’ कारवाई
निवडणुकीत ज्यांचा पराभव होतो तेव्हा पराभव ईव्हिएमच्या माथी मारला जातो. यश आलं की चांगलं पण सर्वोच्च न्यायालायने सांगितलंय याबाबत. लोकसभेत आम्हाल यश मिळालं नाही, तेव्हा आम्ही ईव्हिएमला दोष दिला नाही. ईव्हिएम आज नाही तर वर्षानूवर्षे सुरु आहे, आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी नेते काहीतरी करतात हे दाखवण्याचा प्रयत्न. देशातील पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तेलंगणात ईव्हिएम चांगलं, पण निकाल विरोधात गेला की ईव्हिएमचा दोष असं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
तसेच अमेरिकेत ईव्हीएम मशीन वापरले जात नाही, बॅलेट पेपर वापरला जातो पण ट्रम्प मागे निवडणुकीत पडले होते, आता ते निवडून आले आहेत. कोणीही काहीही आंदोलन केलं तरीही आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिलायं. ईव्हीएम बरोबर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. विरोधकांचा दारुण पराभव झालायं, असं असताना कसं सांगायचं की दारुण पराभव झालायं त्यामुळे पराभव कोणाच्या तरी माथी मारायचं असं विरोधकांचं काम असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.