Download App

एकनाथ शिदेंनंतर मुख्यमंत्री कोण? आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर बच्चू कडू स्पष्टच बोलले…

  • Written By: Last Updated:

Bachchu Kadu On BJP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी करण्यास विलंब झाल्याने सुप्रीम कोर्टाने नुकतंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कृतीवर ताशेरे ओढले. कोर्टाने नार्वेकरांना या संदर्भात आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा विषय लांबणीवर टाकण्याची शिंदे गटाची चाल अपयशी ठरली. नार्वेकर यांना येत्या काही दिवसांत आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देणे अपरिहार्य असल्याचं बोलल्या जातं आहे. १६ आमदार अपात्र झाल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं बोलल्या जातं. या संदर्भात आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाष्य केलं.

एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राज्य सरकार कोसळू शकतं. परिणामी राज्यात अस्थिरता निर्माण होत शकते. असं होऊ नये यासााठी भाजपची पुढची रणनीती तयार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या प्लॅन बी नुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपचा पुढचा पर्याय असण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचीही चर्चा आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी आमदारांची अपात्रता आणि मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावरून मोठे वक्तव्य केले आहे, असं होऊ शकत नाही, असं कडू म्हणाले.

Lok Sabha Election 2024: अखेर जेडीएसची भाजपबरोबर युती ! लोकसभा निवडणूक एकत्र लढणार

बच्चू कडू यांनी अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरतील आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस किंवा राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे, यात किती तथ्य आहे? असा सवाल केला. यावर बोलतांना कडू म्हणाले की, असं होऊ शकत नाही. कारण, असं जर झालंच तर त्याचे भाजपला मोठे परिणाम भोगावे लागलीत. आताच सरकारविषयी नकारात्मक वातावरण आहे, असं कडू म्हणाले.

ते म्हणाले की, आत्ताच ज्या काही गडबडी केल्या आहेत, त्यामुळं राज्यात सरकारविषयी नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. हे वातावरण सकारात्मक करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यातच आता जर एकनाथ शिंदे यांना सत्तेवरून बाहेर काढलं, मुख्यमंत्री पदावरून हटवलं तर भाजपचं नुकसान होईल. कारण, एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे ५ ते १० टक्के मतदार या सगळ्यामुळं नाराज होतील. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यास भाजपचा प्लॅन कामी येणार नाही. शिदेंना हटवलं तर लोक त्यांचा प्लॅन सुरू करतील, मग त्या प्लॅनमध्ये कोणता पक्ष ठेवायचा आणि कोणता पक्ष ठेवायचा नाही ते लोक ठरवतील, असं कडू म्हणाले.

Tags

follow us