NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे कोणत्या गटात जावे, यावरून आमदार संभ्रमात आहेत. काही आमदार हे आधी अजित पवारांकडे गेले होते. त्यानंतर लगेच ते शरद पवारांकडे गेल्याचे आपण पाहिले आहे. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra-Bhuyar) हे ही असेच संभ्रम अवस्थेत होते. परंतु आता त्यांनी अजित पवार गटाची निवड केली आहे.(devendra bhuyar joins ajit pawar group)
नव्या राजकीय समीकरणामुळं BJP च्या ‘या’ आजी-माजी आमदार आणि खासदारांमध्ये धाकधुक
अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला देवेंद्र भुयार हे राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे ते अजित पवारांच्या गटात गेल्याचे स्पष्ट झाले होते. पण देवेंद्र भुयार हे बुधवारी सकाळी वाय. बी. सेंटरला शरद पवार यांच्या सभेला उपस्थित राहिले होते. त्यामुळे ते शरद पवार यांच्या गटात राहतील अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. काही तासानंतर भुयार हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटायले गेले. संध्याकाळी ते अजित पवारांच्या गटात दाखल झाले. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर देवेंद्र भुयार यांचा फोटोही समोर आला आहे.
राष्ट्रवादी 90 तर भाजप 150 जागा लढविणार, अजितदादा मुख्यमंत्रीपदी; शिंदेंच्या वाट्याला काय?
देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरुड मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाकडून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत ते दाखल झाले होते. त्यामुळे पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे. ते अपक्ष आमदार म्हणून गणले जातात. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ३७ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे.
अजित पवार गटाकडून चाळीस आमदार आमच्याबरोबर असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात अजित पवार गटाकडे सध्या ३१ विधानसभा सदस्यांचे समर्थन असल्याचे यादीवरून दिसून येत आहे. त्यात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, नाशिकमधील सरोज आहेर, तुरुंगात असलेले नवाब मलिक यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे तिघे कोणत्या गटाची निवड करतात हेही महत्त्वाचे आहे.
देवेंद्र भुयार हे अजित पवार गटाकडे आले असले तरी ते अपक्ष आमदार आहेत. पक्षाचा आमदार नसल्याने संख्याबळात काही फरक पडणार नाही. परंतु राजकीयदृष्ट्या अजित पवारांना जास्त आमदारांचे संख्याबळही महत्त्वाचे आहे.