Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना मोदींच्या आशीर्वाने आमदारकी मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे 25 वर्षे असलेली युती तुटल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आपल्या पत्रकार परिषदेतून ठाकरे गटावर हल्लोबोल करत आहेत. ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरु असल्याचेही राणे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळतो आहे. दरम्यान आज पुन्हा नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत आपल्या मालकाचे काय झाले, याचा त्यांनी विचार करायला हवा, असा सवाल केला आहे.
IPL मध्ये पराभव गुजरातचा पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आनंद गगनात मावेना!
नितेश राणे म्हणाले की संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारचे 9 वर्षे म्हणजे नाकी नऊ आणणारी आहेत, असे वक्तव्य केले होते. परत एकदा संजय राऊत यांना दिल्लीमध्ये जात भुकायचा प्रकार केला आहे. पण कदाचित संजय राऊत विसरले असतील या 9 वर्षांत 2014 ते 19 ही 5 वर्षे ते एनडीएचे भाग होते. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचे मंत्री होते. तर राऊतांच्या मालकांचे आणि सगळे लाड हे मोदी सरकारच्या मार्फत पुरविले जात होते. त्यांचा मालक जो आमदार म्हणून सगळीकडे मिरवतोय या आमदारकीचा राजीनामा देणार असे बोलला आणि राजीनामा देत नाही. ही आमदारकी देखील त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाने मिळाली आहे, असा टोला नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना लागवला आहे.
Devendra Fadnavis : मुहूर्त निघाला अन् फडणवीसांनी शिवतीर्थ गाठलं; ‘राज’ भेटीत रंगला गप्पांचा फड
ते पुढं म्हणाले की 5 वर्षे मोदीबरोबर राहायचे आणि मुख्यमंत्री पदाची लालसा आल्यानंतर आणि काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचे बिस्कीट फेकल्यानंतर तिकडे लाळ टपकवत गेल्यानंतर त्यांना आता भाजपबद्दल सगळेच चुकीचे वाटू लागले आहे. 25 ते 30 वर्षे असलेली ही युती उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळ बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार गाडून टाकले आहे. राऊतांनी मोदींवर टीका करण्यापेक्षा आपल्या मालकाची काय अवस्था झाली आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लागवला आहे. ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची पूर्णपणे तयारी चालू झालेली आहे, असा दावा त्यांनी पुन्हा केला आहे.