Download App

मी कुणाला घाबरत नाही; भक्तीगडावरील दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा एल्गार…

मी कुणाला घाबरत नाही, महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा. - पंकजा मुंडे

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव (Dasara Melawa) आज बीड येथील सावरगाव घाटावर असलेल्या भगवान भक्तीगडावर पार पडला. मेळाव्यात बोलतांना पंकजा मुंडेंनी आर्यमनपेक्षा मला माझी जनता प्रिय आहे. जेव्हा माझ्यावर जीएसटीचा छापा पडला. तेव्हा या लोकांनी 12 कोटी रुपये भरले, असं म्हणत मी कुणाला घाबरत नाही, महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा, असं विधान त्यांनी केलं.

Video: आचारसंहितेनंतर मुख्य भूमिका जाहीर करणार तेव्हा मी सांगेल ते ऐकायचं; जरांगेंनी शड्डू ठोकला 

पंकजा मुंडेंच्या या मेळाव्याला माजी खासदार प्रीतम मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी अनेक वर्षांनी पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू, असं म्हणत पंकजांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी प्रथमच एका युवकाची ओळख करून दिली. त्या तरुणाला स्टेजवर बोलावले आणि त्याला जवळ घेत पंकजा म्हणाल्या, हा गोरा मुलगा कोण आहे? हा माझ्यापेक्षा आर उंच.. फार गोड आहे. हा माझा मुलगा आर्यमन. तो भगवान बाबाच्या दर्शनाला आला. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण, मी त्याला सांगितले की, तुझ्यापेक्षा मला माझी जनता प्रिय आहे. जेव्हा माझ्यावर जीएसटीचा छापा पडला. तेव्हा या लोकांनी 12 कोटी रुपये भरले. या लोकांनी मला जीव लावला. तुम्ही सर्वांनी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केले. आता मला काही नको, असं भावनिक भाषण पंकजा यांनी केलं.

“दुर्दैवाने महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी राज ठाकरे”, राऊतांचा जोरदार पलटवार 

पुढं त्या म्हणाल्या, माझे बंधू महादेव जानकर. पिवळे शर्टवाले. किती पिवळे शर्ट आहे तुमच्याकडे? गोंडर लेकरू लक्ष्मण हाके. गोंडस आहे की, नाही… काल त्यांनी व्हिडिओ पाठवला. दसरा मेळाव्याला येतो म्हणाले. माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही. पण, माझा सन्मान ठेवून ते आले. मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आले की नाही.. नाशिकहून आले का, नगरहून आले का, बुलढाण्यातून आले का, आता कुठून कुठून आले. तुम्हाला मी दरवर्षी सांष्टांग दंडवत घालते. कारण, माझ्या बापाने मरतांना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली.. तुम्ही मला जिंकवलं, मला इज्जत दिली.. माझ्या पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असं पंकजा म्हणाल्या.

पंकजा म्हणाल्या की, मी कुणाला घाबरत नसून, आपल्याला आपला डाव खेळायचा. माझा पराभव झाल्यानंतर त्याहून इज्जत दिली मी हरल्यामुळे अजितबात नाराज नाही. उसतोड कामगारांचे जीवन बदलल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे
माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिल्याचे म्हणत इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता, असे म्हणत लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू असल्याचे पंकजा म्हणाल्या.

follow us