Download App

सरकारी पैशाची उधळपट्टी करून त्यावर रुबाब करण्यापेक्षा…; रोहित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : सध्या राज्यात आरोग्य, बेरोजगारी, महागाई असे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अनेक वर्षापासून सार्वजनिक आरोग्य धोरण निर्माते आणि डॉक्टर आणखी काही रुग्णालये स्थापन करण्याची गरज व्यक्त करत आहे. मात्र, राज्यात पुरेशा आरोग्यविषयक पायाभूत सुविधा नाहीत. अशातच राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची (Ministry of Health) एक जाहीरात एका राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिध्द झाली. यावरून राष्ट्र्वादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं.

https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0

आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी नवीन रुग्णालयांना मंजूरी देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. आणि आता आरोग्य मंत्रालयाची जाहिरात प्रकाशित झाली. यावर बोलतांना रोहित पवारांनी सरकारी पैशाची उधळपट्टी करून त्यावर रुबाब करण्यापेक्षा राज्याच्या आरोग्यव्यवस्थेकडं थोडं लक्ष दिलं तर बरं होईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

https://x.com/RRPSpeaks/status/1704787578065686745?s=20

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिलं की, एका राष्ट्रीय वृत्तपत्रात फुल पेज जाहिरात द्यायला सरासरी २० लाख रु. खर्च येतो. काही वृत्तपत्र तर ५० लाख रु. पर्यंत घेतात. दीड-दोन कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये जाहिराती देऊन शासकीय तिजोरीतील पैशांची उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत, पण शाळांसाठी, भरतीसाठी, शासकीय रुग्णालयात औषधं देण्यासाठी मात्र सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

सरकारी पैशाची उधळपट्टी करून त्यावर रुबाब करण्यापेक्षा…; रोहित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं 

त्यांनी लिहिलं की, माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडमध्ये शासकीय रुग्णालयांचं ४० % काम झालं. परंतु पुढचा निधी दिला जात नसल्याने निधीअभावी काम ठप्प झालं आहे. शासनाच्या दिरंगाईमुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर शासन जबाबदारी घेईल का? आरोग्य मंत्र्यांच्या स्वःताच्या मतदासंघातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री साहेब सरकारी पैशाची उधळपट्टी करून त्यावर रुबाब करण्यापेक्षा राज्याच्या आरोग्यव्यवस्थेकडं थोडं लक्ष दिलं तर बरं होईल, अशा शब्दात रोहित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला.

Tags

follow us