Sanjay Shirsat : उबाठा गटाकडे युती करण्याच्या मनस्थितीत कुणी नाही. राष्ट्रवादीचं जर पाहिलं तर एक महिन्यापासून त्यांचा साधा संवादही नाही. काँग्रेसही (Congress) त्यांच्यापासून दूर आहे. म्हणून कुणी घर देतं का घर हे जे नाना पाटेकरचं वाक्य होतं तसंच कुणी युती करता युती असं म्हणायची वेळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आली आहे. याचा परिणाम तुम्हाला लवकरच लक्षात येईल. ही आघाडी टिकणारच नाही. कुठं गेली वज्रमूठ ती तर संपली. आता आघाडी सुद्धा त्याच अवस्थेत आहे ती टिकणारच नाही. भविष्यात सगळ्यांना (Election 2024) वेगवेगळं लढावं लागणार हे निश्चित आहे, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आगामी निवडणुकांचं भाकित केलं.
आ. शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. तसेच भविष्यात आघाडीचं काय होणार याचं उत्तरही देऊन टाकलं. ते म्हणाले, आघाडीत सध्या कोणताच संवाद नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि उद्धव ठाकरे गटात मागील एक महिन्यापासून संवाद नाही. काँग्रेसही त्यांच्यापासून लांब आहे. त्यामुळे अशी आघाडी टिकणारच नाही.
Rohit Pawar : ‘त्या’ दोन नेत्यांची नावं जाहीर कराच! शिरसाटांचं रोहित पवारांना थेट चॅलेंज
मुंबईत एका मराठी महिलेला एका सोसायटीत जागा नाकारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यावर संजय शिरसाट यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मराठी माणसाला घरी मिळालाच पाहिजे आणि असं जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ते योग्य नाहीच. मुंबई ही जर मराठी माणसाची आहे आणि तो जर बेघर होत असेल त्याला घर मिळत नसेल तर हे शोभण्यासारखे नाही त्याला घर देत नाही त्यांची कोणी बाजू सुद्धा कोणी घेणार नाही याला कारणीभूत उबाठा गटाचे लोक आहेत. मतं मागताना या सर्व गोष्टींची तुम्हाला गरज आहे कोणाची बाजू घ्यायची असेल तर खंबीरपणे घ्या. मुंबईमध्ये मराठी माणसाच्या हक्कावर कोणी गदा आणत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित केली जाईल.