Download App

Sunil Shelke : सत्तेत जायचं हे सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच ठरलं, आमदार शेळकेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Sunil Shelke : राज्यातील राजकारणासाठी रविवारचा दिवस खूप महत्वाचा ठरला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) बंडखोरी केल्यानं पक्षात उभी फुट पडली. राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन त्यांनी शिंदे -फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं डबल इंजिन सरकारला आणखी एकाची साथ मिळाली. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनीही मोठं विधान केलं. सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) उपस्थितीत सत्तेत जाण्याचं ठरलं होतं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ( MLA Sunil Shelke On ajit pawar Rebellion they said go to power with shinde fadanvis is decided plan in the presensce of supriya sule)

आमदार सुनील शेळके अजित पवारांच्या बंडाविषयी बोलतांना म्हणाले, सत्तेत सहभागी होण्यापूर्वी साहेबांना (शरद पवार) विचारायला आम्ही जावं, असं आम्हाला वाटत नव्हतं. कारण, ज्यावेळी आमचा सत्तेत जाण्याचा विचार झाला, तेव्हा झालेल्या चर्चेच्या वेळी खुद्द सुप्रिया ताईही तिथे होत्या. शिवाय, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे सर्व ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. या सर्वांनी हा निर्णय घेतला असेल तर तो योग्य निर्णय असेल, असं आमदार शेळके यांनी सांगितलं.

‘कधी कधी वाटतं मोबाईल बंद करावा अन् दिंडीत निघून जावं’; राष्ट्रवादीतील नाट्यावर लंके बोलले 

अजित पवारांनी बंडखोरी केल्यानं अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. अजित पवारांनी खरोखर बंड केल का? की, अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा होता? असे अनेक प्रश्न जनतेला पडलेत. कारण, अजित पवारांच्या शपथ विधीला शरद पवारांचे निवटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, आता आमदार शेळकेंनी सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत सत्तेत जाण्याचं ठरलं होतं, असं वक्तव्य केलं. त्यामुळं या बंडाची कल्पना सुप्रिया सुळेंना होती की, काय असा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आता आमदार शेळके यांनी केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधतांना शरद पवारांनी मी खंबीर आहे. लढायला मजुबत आहे, असं सांगत आपला अजित पवारांच्या बंडाला कोणताही पाठिंबा नसल्याचं जाहिर केलं होतं. तर आज बोलतांना त्यांना सांगितलं की, ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, त्यांना माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. ज्यांना बंड केलं त्यांनी माझा फोटो वापरू नये, अशा शब्दात अजित पवार गटाला खडसावलं.

 

Tags

follow us