Download App

आमदारांना भेटायचे नाहीत, मग आमदार कंटाळून सोडून गेले; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

  • Written By: Last Updated:

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudipadva) भाषणात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणूक लढवली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधी विचारांच्या पक्षांविरोधात शिवसेनेने निवडणूक लढवली आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदात मश्गुल होते, आमदारांना भेटायचे नाहीत. मग 40 आमदार कंटाळून सोडून गेले, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे सांगत असतात, भाजपनं कबूल केलं होतं की, अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ. मात्र, भाजपने निवडणुका झाल्यावर आपले शब्द फिरवले. दरम्यान, अमित शाह ह्यांनी चार भिंतीत आश्वासन दिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले, मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचं नाव पुढचे मुख्यमंत्री म्हणून घेत होते तेंव्हा का नाही उद्धव ठाकेरंनी आक्षेप घेतलात ? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

निवडणुकांचे निकाल लागेले आणि आपल्याशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर नंतर मागून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी काढली, असं राज ठाकरे म्हणाले.

त्यांनी सांगिलतं की, भाजपने उध्दव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची मागणी शेवटपर्यंत मान्य न केल्यानं शिवसेनेने विरोधी विचाराच्या पक्षासोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. 2019 च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी ह्यांच्या युतीला सत्तेत येण्यासाठी मतदान केलं. आणि अचानक यांनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांच्या सोबत सरकार स्थापन केलं. काय म्हणावं याला?

राज ठाकरे म्हणाले, मला शिवसेनापक्षप्रमुख व्हायचंच नव्हतं, कारण… 

याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी केला. काकांनी डोळे वटारले. अन् सरकार पडलं. काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात? तर फक्त फक्त सत्तेची थेर चालली. ही सगळी थेरं करण्यासाठी तुम्ही मतदान करता? महाराष्ट्राच्या राजकारणाच चिखल करून ठेवला असं ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, की, माझं तर मत आहे की, एकदा निवडणूका घ्याच अन् जनतेला ठरवू द्या. जनता ठरवेल की, कुणाच्या तोंडात शेण घालायचं आहे अन् कुणाला सत्तेत बसवायचं.. असं राज ठाकरे म्हणाले.

Tags

follow us