Download App

‘राजाचा मुलगा राजा होणार नाही, ज्याची योग्यता तोच आमदार होणार’

मुंबई : आज पदवीधर निवडणुकीसाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील उपस्थित होत्या. यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या की, राजाचा मुलगा हा राजा होणार नाही, ज्याची योग्यता तोच आमदार होणार. पाठिंब्याविषयी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगली चर्चा झाली आहे. मी 10 वर्षांपासून संघर्ष करत आहे. उध्दव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं शुभांगी यांनी सांगितलं. त्याचवेळी मैदानावर लढणाऱ्या महिलेला उध्दव ठाकरे यांनी आमदार बनविण्याचा निर्णय घेतल्याचं नाशिक पदवीधर मतदार संघाच्या अपक्ष आमदार शुभांगी पाटील यांनी सांगितलं.

पाटील यांनी व्हिडीओमधून त्यांची भूमिका मांडलीय. महाविकास आघाडीनं आपला अधिकृ उमेदवार निश्चित केला होता. त्यांना एबी फॉर्मदेखील दिला. भाजपकडून दोन दोघांना उमेदवारी मिळेल असं सांगण्यात येत होतं. त्यातही शुभांगी पाटील यांना एबी फॉर्म देऊ असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मात्र दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या नेत्यानं स्वतःचा अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा अपक्ष अर्ज भरला. एवढं नाट्य कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडलं नव्हतं. विचित्र राजकारणाला आपण सामोरं जात आहोत.

सामान्य घरातील मुलीनं राजकारणात पुढे येऊच नये, असं काहींना वाटतंय. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. संपूर्ण महाराष्ट्राला माझे कर्तृत्व माहीत आहे. भाजपकडं मी अनेक दिवसांपासून उमेदवारी मागत होते. भाजपनंही माझं काम मान्य केलं होतं. पण राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझं बलिदान दिलं जातंय. माझ्यासाठी माझं पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरलेत. त्यामुळं आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलंय.

Tags

follow us