MLC Election Thackeray dismissal Devyani Dongaonkar for withdrawing the application at time : राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कोकण आणि मराठवाडा या दोन ठिकाणी मोठा धक्का बसला आहे. कारण कोकणात बाळ माने यांनी पक्षाचा आदेश नसताना माघार घेतली. तर इकडे मराठवाड्यात मविआ आणि शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असलेल्या देवयानी डोनगावकर यांनी देखील ऐनवेळी माघात घेतली आहे. त्यावर आता पक्षाने दोघांचीही हकालपट्टी केली आहे.
मराठा आरक्षण लढ्यातील मृतांच्या कुटुंबियांना नोकरीनंतर आता प्रत्येकी 10 लाखांची मदत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पक्षशिस्त भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. माने यांच्यानंतर आता डोनगावकर यांच्यावरही पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या निर्णयामुळे पक्षाला राजकीय फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने तत्काळ दखल घेत शिस्तभंगाची कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये ; ‘या’ ठिकाणी 13 लाखांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त
मविआचे उबाठाचे उमेदवार बाळ माने यांनी भाजपच्या नितेश राणेंसोबत जात परस्पर अर्ज माघारी घेतल्याने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
याबाबत ट्विट करताना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलं की, बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.
