अजित पवारांचा उद्धटपणा पाहूनच शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला; राज ठाकरेंचं धक्कादायक विधान

Raj Thackeray On Sharad Pawar Retirement : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये सुरु आहे. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या राजीनामा देण्यावरुन अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी शरद पवार यांनी नेमका राजीनामा मागे का घेतला? याबद्दल सांगितलं आहे. पलक तिवारीच्या बोल्ड फोटोनं इंटरनेटवर […]

मत न देणाऱ्यांचा सूड नव्हे तर, कामंही करा; गाव स्वच्छतेचा कानमंत्र देत राज ठाकरेंची मोठी घोषणा

मत न देणाऱ्यांचा सूड नव्हे तर, कामंही करा; गाव स्वच्छतेचा कानमंत्र देत राज ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray On Sharad Pawar Retirement : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये सुरु आहे. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या राजीनामा देण्यावरुन अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी शरद पवार यांनी नेमका राजीनामा मागे का घेतला? याबद्दल सांगितलं आहे.

पलक तिवारीच्या बोल्ड फोटोनं इंटरनेटवर लावली आग…

आपण सगळीकडेच सभा घेणार असल्याचं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं आहे. बरेच विषय तुंबले आहेत. नालेसफाई होणं गरजेचं आहे. पावसाळा तोंडावर आहे. सध्याची राज्याची एकूण राजकीय परिस्थिती समजेनाशी झाली आहे.

गेली दोन चार वर्ष कोण कुठं आहे हेच समजत नाही. कुणी आमदार समोर आले की, समोर येतो तेव्हा समजत नाही की, कोणत्या पक्षाचा आहे. असं विचारावं लागतं की, सध्या कुठं आहे? आणि दुसरीकडे तो राजीनाम्याचा गोंधळ तो कालच संपला.

मला असं वाटतं की, खरचं त्यांना राजीनामा द्यायचा होता. पण त्यावेळी अजित पवार जे काही वागले, ए शांत बस, ए तू गप्प बस, माईक हातातून घे, ते सगळं पवार साहेबांच्या डोळ्यासमोर होत असताना त्यांनी पाहिलं.

माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते, ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची घोषणा केली तर, हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

काय चालू होतं काही पोच नाही काही नाही, जणू काही उकळ्या फुटत होत्या. होतंय ते बरं होतंय, मी माझ्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं काकांकडे लक्ष द्या. ते कधी काय करतील ते सांगता येत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. पुढे असो तो त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असं म्हणून त्या विषयावर पुढे बोलणं राज ठाकरेंनी टाळलं.

Exit mobile version