Mohit Kamboj : ‘मी व्हिडीओ दाखवला तर…’ राऊतांच्या आरोपांवर कंबोज यांचा आदित्य आणि तेजस ठाकरेंवर निशाणा

Mohit Kamboj Press Conference On Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री 3 वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला होता. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. यावर […]

Raut Kamboj

Raut Kamboj

Mohit Kamboj Press Conference On Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री 3 वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला होता. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. यावर आता पत्रकार परिषद घेत भाजप नेते मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण देत राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

कंबोज यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्रीची आहे. तसेच संजय राऊत ज्याला डान्सबार म्हणत आहेत ते एक फॅमिली रेस्टॉरंट आहे. तेथे मी होतो. त्यावर संजय राऊतांनी मिडीयाला चुकीची माहिती दिली. मात्र या घटनेमागील सत्य हे आहे की, मी आणि माझी पत्नी टेबलवर बसलेलो असताना तेथे गोंधळ सुरू झाला. काही तरूणांनी मारामारी सुरू केली आणि संभाजी ब्रिग्रेडचे सचिन कांबळे यांनी तेथे व्हिडीओ शुट केला. आणखी काही तरूण ज्यांच्याकडे बंदुक होती ते आत आले.

Mohit Kamboj : राऊतांच्या ‘त्या’ आरोपांनंतर आज कंबोज पत्रकार परिषद घेणार

या लोकांनी माझ्यावर नजर ठेवलेली आहे. ते माझा पाठलाग करत आहेत.हा व्हिडीओ त्यांनीनंतर चुकीच्या पद्धतीने दाखवला. त्यात सांगितल्याप्रमाणे मी डान्स करत होतो, मी पोलिसांना धक्काबुक्की केली हे सर्व खोट आहे. तसेच संजय राऊत हे कहाण्या बनवण्यात माहिक आहेत त्यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आणि फडणवीसांना पत्र लिहिले.

तसेच यावेळी कंबोज यांनी आपण आणि आपल्या कुटुंबाला धमकी देण्यात आल्याचा आरोप केला आहे. आपण पोलिसांना आपण याची माहिती दिली आहे. तर मी जर व्हिडीओ दाखवायला सुरूवात केली तर महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्यांची मुल तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. तर तेजस आणि आदित्य ठाकरे हे दोघ कोरोनामध्ये रात्री 10 नंतर हॉटेल उघडायला लावत होते. बिल न देता दारू पित होते. असा धक्कादायक आरोप कंबोज यांनी केला आहे.

Exit mobile version