Download App

सचिन अहिर भाजपसोबत येतील आणि परबांची अवस्था अश्वत्थामासारखी होईल; मुनगंटीवारांची भविष्यवाणी

Sudhir Mungantiwar On Sachin Ahir : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे गटाचे सदस्य सचिन अहिर यांनी केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचवेळी भविष्यवाणी केली की, एक दिवस असा येईल, सचिन अहिर सुद्धा एक दिवस भाजपबरोबर असतील. हे मी गंमत म्हणून बोलत नाही तर हे अतिशय गंभीरपणे बोलत आहे. आणि अरब परबांची अवस्था त्या महाभारताच्या अश्वत्थामासारखी नाही झाली तर माझं नाव बदलून ठेवा, असा इशाराच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.(Monsoon Session Sudhir Mungantiwar says sachin ahir will be seen with BJP anil parab shivsena thackeray group)

‘उद्धवजी, हीच ती वेळ! फक्त ‘टोमणे’ मारणार की उत्तरं देणार?’ बावनकुळेंनी साधलं बंगळुरूच्या बैठकीचं टायमिंग

विधानपरिषदेमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आपण जेव्हा एखाद्या गुणवत्तेच्या विषयावर चर्चा करतो, त्यावेळी आरडाओरड करुन समोरच्याला थांबवणं योग्य नाही. चर्चा गुणवत्तेवर आहे. एका महत्वाच्या कायदेविषयक बाबीवर आहे, महाराष्ट्र विधानपरिषद नियमावर आहे, त्यामध्ये जर मतच मांडायचं नाही? आम्ही म्हणू तेच ऐकायचं असं धोरण चालत नाही, मग एक दिवस आपल्याला पक्ष मायक्रोस्कोपमध्ये पाहावा लागतो, असा टोलाही शिवसेना ठाकरे गटाला लगावला.

‘उद्धवजी, हीच ती वेळ! फक्त ‘टोमणे’ मारणार की उत्तरं देणार?’ बावनकुळेंनी साधलं बंगळुरूच्या बैठकीचं टायमिंग

आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या और बलिदान यही भाजप की है पहचान आहे. त्यामुळे त्याचा विचार करु नका, मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार असे म्हणत मंत्री मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. या भावनेने आमचं राजकारण होत नाही, बरोबर आहे ना खडसेसाहेब असेही मुनगंटीवार म्हणाले. त्याचवेळी विरोधकांकडून भाजपचे 105 आमदार त्यागच करत आहेत असेही मिश्किलपणे म्हणाले. त्यावर मुनगंटीवरांनी हो आहे ना त्याग असे उत्तर दिले.

त्याचवेळी मंत्री म्हणाले की, अहो सचिनजी मी आत्ता या ठिकाणी भविष्यवाणी करतो की, एक दिवस असा येईल की, सचिन अहिर सुद्धा भाजपसोबत येईल, हे मी गंमत म्हणून सांगत नाही तर अतिशय गंभीरपणे सांगत आहे. त्यावेळी अनिल परब यांची अवस्था त्या महाभारतामधील अश्वत्थामासारखी होईल, असा इशाराही यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

Tags

follow us