Download App

‘शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघारी फिरतात’; पटेलांनी इतिहासाचा पाढाच वाचला

Image Credit: Letsupp

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)

Prafulla Patel On Sharad Pawar :
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. जाहीर सभांच्या माध्यमातून दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप सुरु आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या इतिहासाचा पाढाच वाचून दाखवला आहे. यावेळी बोलताना शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघारी फिरत असल्याचं पटेलांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार यांच्यात क्षमता असूनही ते शेवटच्या माघारी फिरतात. पंतप्रधान पद हाताशी येतानाही ते माघारी फिरले आहेत. त्यांचा हा स्वभाव अजूनही समजत नाही. शरद पवार हे इतिहासात कितीदा संधी असून सर्वदा ते माघारी फिरले याची जंत्रीच प्रफुल्ल पटेल यांनी वाचून दाखवली आहे.

‘पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं’; धनंजय मुंडेंनी सांगितली अंदर की बात

पवार 2004 सालीच भाजपासोबत जाणार होते…
शरद पवार पहिल्यांदा भाजपसोबत जाणार होते. 2004 साली प्रमोद महाजन आणि आम्ही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली होती. लालकृष्ण अडवाणी आणि अलटबिहारी वाजपेयी यांच्या सूचनेनूसार ही मिटींग झाली होती, पण प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. शरद पवार यांचे वजन वाढेल म्हणून प्रमोद महाजन यांना हे नको होते. त्यामुळे महाजनांनी ही बातमी बाळासाहेब ठाकरेंना दिली. ठाकरेंकडून पवारांवर आरोप होताच पवार-भाजप युती होऊ शकली नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधानपदाची संधी तरीही पवारांनी…
सीताराम केसरी अध्यक्ष असताना 140 खासदार हे शरद पवारांसोबत होते. यावेळी देवेगौडा हे पंतप्रधान झाले होते. केसरी यांच्या स्वभावाला कंटाळून देवेगौडा राजीनामा देणार होते. त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधान होण्यासाठी निरोप पाठवला. देवेगौडा यांच्यासह 140 खासदार एकत्र असूनही पवार ऐनवेळी माघारी फिरले. पवार का माघारी फिरले हे मला अजूनपर्यंत समजले नाही.

Salaar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासच्या ‘सालार’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी येणार भेटीला

2014 साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीनंतर अचानक शरद पवार यांनी ऐनवेळी भाजप सोबत न जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक फिस्कटली होती. शरद पवार हे बैठकीतून निघून गेले. शरद पवार जाताना मला अजित पवार यांना सांगून गेले तुम्ही काही निर्णय घ्या. त्या दिवशी अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधीसाठी भाजप सोबत गेले. असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

माझे शरद पवार यांच्याशी वैयक्तिक वाद नाहीत पण आमची राजकीय भूमिका शरद पवार यांच्या विरोधात आहे. आता आपण सगळे अजितदादा यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मी शरद पवारांसोबत होतो आता कायमस्वरूपी अजित पवार यांच्यासोबत असल्याचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार आहे त्यावेळी मी माझी बाजू मांडणार असून इथं दिलीप वळसे पाटील देखील बसले आहेत. त्यांच्या देखील पोटात खूप काही दडलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पोटात साठवल्या असल्याचं पटेलांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज