मुंबई : शिवसेना (shivsena) ही काय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) बापाची नाही, जी निवडणूक आयोगाने कुणाच्याही हाती द्यावी. ही शिवसेना सामान्य जनतेची आहे. जनतेचा महासागर तुम्हाला खेडमध्ये दिसला असेलच. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा त्यांच्या गटाचे लोकं भारतीय जनता पार्टीचे लोक असं म्हणतात की शिवसेना आमची आहे, यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली.
आज शिमगा आहे आणि जनता शिमगा एकनाथ शिंदेंच्या नावाने सुरू असल्याची जोरदार टीका संजय राऊत यांनी केली. एवढंच नाही तर सरकारच्या विरोधामध्ये बोललं की हल्ले केले जात आहेत. ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा दूरउपयोग केला जात आहे, विरोधकांना संपवलं जातं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.
ईडी आणि सीबीआयचा वापर शस्त्रांसारखा केला जात आहे. यामुळे रविवारी प्रमुख विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. राहुल गांधी जे केंब्रिजमध्ये सांगितल की लोकशाही धोक्यात नाही तर संपत जात आहे, या भूमिकेशी मी सहमत आहे. लोकशाहीचा देशामध्ये मुडदा पडला असल्याचे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना ही टीका त्यांनी केली आहे.
बेळगाव बरोबरच सीमाभाग हा आपण महाराष्ट्राचा मानला जातो. राजकीय अडचणी असणार आहेत, बेळगावमध्ये जाऊन जय महाराष्ट्र म्हणायचं नसेल तर अशा लोकांनी त्याठिकाणी जाऊच नये असंही संजय राऊत यांनी सांगितल आहे. खेडमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये जनतेचा महासागर दिसला. तो महासागर हेच शिवसेना कुणाच्या तरी हातात देणाऱ्यांना उत्तर आहे असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.