Download App

राहुल कुल सावध रहा… संजय राऊत येत आहेत!

  • Written By: Last Updated:

MP Sanjay Raut’s meeting in Daund taluk on 26 April : दौंड विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या राजकीय अडचणी वाढवण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. कारण, दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यीतल कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून संजय राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा दौंड तालुक्यात 26 एप्रिल रोजी होणार आहे. कुल यांच्या कारखान्यातील 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची कागदोपत्री पोलखोल या सभेत केली जाणार आहे, अशी माहिती दौंडचे माजी आमदार तथा पुणे मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रमेश थोरात यांनी दिली. त्यामुळं राऊत यांच्या सभेविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांना चोरमंडळ म्हटल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी हक्कभंग समिती स्थापन झाली. या समितीच्या अध्यक्षपदी भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांची निवड झाली. त्यानंतर काहीच दिवसात राऊत यांनी भीमा साखर कारखान्यात 500 कोटींची गैरव्यवहारा झाल्याचा आरोप केला होता. राऊत यांनी 13 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीमा साखर कारखान्यामधील गैरकारभाराच्या चौकशीची लेखी मागणी केली होती. राऊत यांच्या या मागणीनंतर दौंड तालुक्याचं राजकारण ढवळून निघालं.

तुम्ही दंगली घडवायच्या ठरवले आहे का? फडणवीसांचा आव्हाडांना सवाल

आमदार कुल यांच्या सर्थकांनी खा. राऊतांचा निषेध करत तालुक्यात निदर्शने केली, तर माजी आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांनी राऊत यांच्या समर्थनार्थ तालुक्यात अनेक ठिकाणी पोस्टर्स लावले होते. या पार्श्वभूमीवर राऊत हे लवकरच दौंड तालुक्यात येतील, असं सांगितलं जातं होतं. मात्र त्यांच्या येण्याची तारीख ठरली नव्हती. दरम्यान, मुंबई येथे खा. राऊत यांची भेट घेत माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक शरद सुर्यवंशी यांनी त्यांना सभेसाठी निमंत्रित केले होते.

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना शेतकरी कृती समितीच्या वतीने वरवंडला 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे. खा. संजय राऊत व सुषमा अंधारे सभेत पोलखोल करणार आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार तथा दौंड तालुक्याचे भूमीपत्र रवींद्र धंगेकर यांचा या वेळी सत्कार होणार आहे.

खा. राऊत यांनी कुल यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढली काढली होती. प्रतिमा जाळल्या होत्या. जाळपोळ करण्यापेक्षा राहुल कुल यांनी चौकशीला सामोरे जात दुध का दुध, पाणी का पाणी केलं पाहिजे होतं, अशी टीका राऊतांनी केली होती. दरम्यान, आता 26 तारखेच्या सभेत खा. राऊत हे राहुल कुल यांच्यावर कशा पद्धतीने हल्लाबोल करतात, हेच पाहणं औत्सुक्याच आहे.

 

Tags

follow us