Mr. Pawar should withdraw his retirement decision : काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या या निर्णयावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सामान्य माणसांनाही पवारांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय पटला नसल्याच्या लोक भावना समोर येत आहेत. त्यांनी तीन दिवसांनी का होईना, त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी राज्यातील लोकांची भावना आहे. आताही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपला एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यातून लोकभावना काय आहे हे दिसून दिसते.
सुप्रिया सुळे ह्या मॉर्निक वाॉकला गेल्या होत्या. त्या व्हिडिओत सुप्रिया सुळे सांगतात की, आज मी कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळं जरा वेळ काढून मॉर्निक वॉकला जावं असा विचार करून वॉकला आले आहे, असं सांगताच एका सफाई कामगाराची त्या ओळख करून देतात. हे संदेश पवार आहेत. आत्ताच मला भेटले. त्यांनी त्यांच्या भावना मला सांगितल्या. काय आहेत त्यांच्या भावना, त्यांना काय वाटतं, त्यांच्याकडून ऐका. त्यानंतर सफाई कामगार बोलायला लागतात. ते सांगतात की, काल मी शरद पवारांच्या बातम्या पाहिल्या. त्यांनी अध्यक्षपदावरून बाजूला व्हायचं आणि राजकीय संन्यास घ्यायचा हा निर्णय घेतला, तो निर्णय मान्य माझ्यासारख्या सामान्य माणसांना मान्य होणं अवघड आहे.
पुढचे 5 दिवस पुन्हा पावसाची हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
ते सांगतात की, पवार साहेब फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे आहेत. ते सर्वमामान्य माणसाच्या हिताचा विचार करतात. त्यांच्यासारख्या नेत्यांची आज सर्वसामान्य माणसाला गरज आहे. मला वैयक्तिक असं वाटतं की, पवार साहेबांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, आणि पुन्हा राष्ट्रवादीची धुरा आपल्या हाती घ्यावी. हे खूप आतून वाटतं. त्यांनी आपला निर्णय बदलवावा, राजकारणातून निवृत्त होऊ नये, अशी पवार साहेबांना कळकळीची विनंती आहे, असं सफाईकामगार पवार सांगतात.
पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांना रडू कोसळले होतं. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, सामान्य माणूसही पवारांच्या निर्णयाविषयी समाधानी नसल्याचं दिसतं आहे