Ujjwal Nikam News : ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) राष्ट्रपती कोट्यातून खासदारपदी नियुक्ती झाली आहे. निकम यांच्यासह आणखी तिघांना खासदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर निकम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल निकम यांनी राष्ट्रपतींसह पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानले. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत आलेले अनुभवही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. पीएम मोदींनी मला फोन करून माझ्याशी मराठी भाषेतच संवाद साधला असे उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले.
माझी राज्यसभेचा खासदार म्हणून नियुक्ती केली. हा मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला त्याचं हे फळ आहे असं मी मानतो. मला काल पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन (PM Narendra Modi) केला. पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत विचारला की उज्ज्वलजी मराठीत बोलू की हिंदीत बोलू? मी हसलो तेही खळखळून हसले. त्यांना उत्तर देताना मी म्हटलं तुमचं दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. आपण कोणत्याही भाषेत संभाषण करू शकता. त्यांनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं. त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छितात. ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
खासदार होताच उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुकीत..”
मी लोकसभेच्या निवडणुकीत तेवढ्या पुरताच होतो. लोकसभेची निवडणूक ही एका वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली. जिथे गैरसमजुती पसरवल्या गेल्या. त्या गैरसमजुतींना लोक बळी पडले. नंतर त्या लोकांच्या लक्षात आलं की आपलं चुकलं. हा जो गोबेल्स प्रोपगेंडा आहे. विशेषतः कसाबच्या गोळीने आमच्या शहीदांची हत्या झाली नाही असे सांगण्यापर्यंत काही राजकीय नेत्यांची मजल गेली होती. हा गोबेल्स प्रोपगेंडा काय असतो हे मला लोकसभेच्या निवडणुकीत पहायला मिळालं. पण नंतर जनतेनं विधानसभेत दाखवून दिलं. जनता साक्षर आहे ही गोष्ट काही राजकीय शक्ती विसरतात त्यांनी विसरु नये इतकीच माझी नम्र सूचना आहे.
ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह राष्ट्रपतींनी आणखी तिघा जणांची खासदार म्हणून नियुक्ती केली. हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन, सी. सदानंद मास्टर यांचीही नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. हर्षवर्धन श्रृंगला माजी परराष्ट्र सचिव आहेत. सदानंद मास्टर केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. मीनाक्षी जैन या प्रसिद्ध इतिहासकार आहेत. भारताचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं आहे. या सर्वांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदारपदी निवड झाली आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांना राज्य सरकारचा दणका! ॲलोपॅथी उपचाराची परवानगी रद्द, निर्णय घेतला मागे