Municipal Corporation Election : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची सर्वांना प्रतिक्षा आहे. यासंदर्भातील सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लटकली असल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पण आता निवडणुकीसंदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. बीएमसीसह सर्वच महापालिकांच्या निवडणुका (BMC Elections) 2024 पर्यत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टात लागलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालामुळे उद्धव ठाकरेंकडे सहानुभूतीची लाट असल्याची अटकळ सरकारमधील मंत्र्यांकडून बांधली जातीय. नुकत्याच झालेल्या कर्नाटकमधील विधानसभा निकाल महाविकाश आघाडीचा आत्मविश्वास दुनावला आहे. सध्या सत्ताधाऱ्यांना राज्यात अनुकूल वातावरण नसल्याचा अंदाज बांधत निवडणुका पुढं ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अजित पवारांचे मोठे विधान
निवडणुका पुढे ढकलण्याची कारणं?
● कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयामुळे महाविकास आघाडीला बळ
● सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्ष निकालामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल
● आताच निवडणुका घेतल्यास भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता
● सहानुभूतीची लाट ओसरण्याची प्रतीक्षा करण्याची तयारी
● महाविकास आघाडीतील संघर्षाकडे शिंदे-फडणवीसांचे लक्ष
राज्यातील जवळपास 23 महानगरपालिका गेल्या दोन वर्षापासून प्रशासकाद्वारे चालवल्या जात आहेत. आधी कोविडमुळे आणि नंतर ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकरमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यामुळे देशातील निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव भाजपा आखत आहे. कर्नाटकमध्ये कमळाच्या पाकळ्या गळाल्या आहेत. हिंमत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे संजय राऊत म्हणाले होते.