Nana Patole criticizes On BJP Party : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसू लागले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र या चर्चा नाना पटोले यांनी फेटाळून लावल्या. आमच्यात कोणीही नाराज नाही आहे. नाराजी ही भाजपकडून पेरली जात आहे. मात्र आम्ही सगळे जण एक आहोत अशा शब्दात नाराजीनाट्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले.
महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान मविआची बैठक पार पडली व त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चाना नाना पटोले यांनी फेटाळून लावत भाजपवर निशाणा साधला आहे.
आमच्यात कोणतीही नाराजी नाही आहे. मूळ विषयांना डावलण्यात यावे यासाठी भाजपकडून अशा प्रकारच्या अफवा माध्यमातून पेरल्या जात आहे. आपण आज पहिले असेल की आम्ही सगळेजण एकत्र आहोत तसेच आम्ही एकत्रच राहू असे म्हणतच नाना पटोले यांनी महविकास आघाडीमधील नाराजीबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे.
कोर्टाच्या निकालावर पटोले म्हणाले
राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले, तुम्ही कोर्टाचा निर्णय व्यवस्थित पहिला तर ठाकरेंच्या बाजूनेच निर्णय दिला आहे. पक्ष हा मोठा असतो आमदार – खासदार हे मोठे नसतात. तसेच आयाराम गयाराम यांना लोकशाहीमध्ये काही एक महत्व नसते.
कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्राचे सरकार हे भ्रष्टाचारी, पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही हेच सुप्रीम कोर्टाने निकालाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधात हा निर्णय झालेला नाही आहे. हा चुकीचा गैरसमज निर्माण केला जातो आहे. थोड्या दिवसांचा जीव वाचला आहे थोडा ऑक्सिजन आहे याला तुम्ही निकाल तुमच्या बाजूने लागला असे म्हणत असाल तर हे तुमचे मत आहे. त्याला आमचा नाईलाज आहे. तुम्ही पाहा उद्धव ठाकरेंचा विजय होईल असे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.