Nana Patole : लोकसभेनंतर आता आगामी विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीतही मविआ महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का देण्याच्या तयारीला लागली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचे संकेत मविआकडून दिले जात आहेत. मात्र महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हे ठरत नाही. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) भाष्य केलं.
बैलजोडी विना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणुक, पुनीत बालन यांची घोषणा
महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ, छोटा भाऊ नाही, जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसार होईल, असंही पटोलेंनी स्पष्ट केलं.
आज मुंबईतील गांधी भवनात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणी मोठा, छोटा भाऊ नाही. जागावाटपाचा निर्णय मेरिटनुसारच होणार आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही अशीच भूमिका घेतली असल्याचं पटोलेंनी सांगितलं.
Bangladesh Protests : मोठी बातमी! बांग्लादेशात स्थापन होणार अंतरिम सरकार, गुरुवारी शपथविधी
जनतेला अपेक्षित असा जाहीरनामा तयार करणार
आजच्या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली तसेच राज्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे समाजातील विविध घटकांशी चर्चा करून राज्यातील जनतेला अपेक्षित असा जाहीरनामा तयार करतील, असंही पटोले म्हणाले.
जनता महायुतीला घरी बसवेल…
महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का दिला. स्वयंघोषित विश्वगुरूंनी राज्यात 17 जाहीर सभा घेतल्या, पण जनतेने त्यांना जागा दाखवली. जनता विसरून जाते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. पण, महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे महायुती सरकारने केलेले पाप महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. महायुतीला विधानसभा निवडणुक जनता घरी बसवेल, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला.