Download App

पटोलेंनी राऊतांना जागा वाटपावरून फटकारले; ‘मविआत अडचणी निर्माण करू नका’

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यावरून महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi)चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीची चाचपणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला रोखण्याची तयारी आता माविआने तयारी केल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या वृत्ताला दुजोरा देत ठाकरे गटाचे 19 उमेदवार लोकसभेसाठी उभे राहतील, असं सांगितले. त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राऊतांना आघाडीत अडचणी निर्माण करू नका, अशा शब्दात फटकारले आहे.

2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, ठाकरे गटाचे 19 खासदार लोकसभेत दिसतील, असा राऊतांनी दावा केला.

राऊतांच्या वक्तव्यावर बोलतांना पटोले यांनी सांगितले की, जागांसाठी लढण्यापेक्षा जागा कशा जिंकता येतील यावर चर्चा करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. लोकसभेच्या मेरीटच्या आधारावरच जागा वाटप केलं जावं असं कॉंग्रेसला वाटतं. जागा वाटपाविषयी अजून काहीही ठरलं नाही. त्यामुळं अशा पध्दतीचे वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीमध्ये अडचण निर्माण करू नये, असा आमचा सल्ला आहे, असे नाना पटोले यांनी राऊतांच्या वक्तव्यावर सांगितले.

जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, अशी चर्चाही झालेली नाही. जागा वाटपाबाबत आमच्या तिन्ही पक्षांकडून 3-3 सदस्य देऊन 9 सदस्यीय समिती स्थापन करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली असेल, तर त्यात गैर काहीच नाही, असे शरद पवार यांच्या प्रश्नावर पटोले म्हणाले. पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेसही आपले काम करत असून आमची चाचपणी सुरू आहे.

“ठाकरे गट लोकसभेच्या 19 जागा जिंकेल”

पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत एकत्र लढण्यावर चर्चा झाली. कोणी काहीही बोलले तरी मविआ एकत्रच लढणार आहे. आमचे 19 खासदार लोकसभेत राहतील, असे ठाकरे खासदार संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादीने गेल्या वेळी लोकसभेच्या चार जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने एक जागा जिंकली तरी ती त्यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे जिंकून कोण कुठे गेले यावर जागावाटप होणार नाही. दादरा नगर हवेलीतून आमचा खासदार आहे, महाराष्ट्रात अठरा  जागा जिंकल्या होत्या. लोकसभेत आमचे 19 खासदार असतील एवढेच मी म्हणेन, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us