Download App

Narayan Rane : ‘संजय दत्त ‘मातोश्री’त बॅग घेऊन आला’; नारायण राणेंनी सगळचं बाहेर काढलं

Narayan Rane On Udhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान, उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. खासदार गजानन किर्तीकर(Gajanan Kirtikar) यांच्या ‘लोकाधिकार आणि मी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेच्या प्रवासाविषयी भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिवसेना आणि मातोश्रीबद्दलचे अनेक गुपितं बाहेर काढली आहेत.

बुलढाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ला फडणवीस-पवार का नाही आले? सीएम शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण…

नारायण राणे(Narayan Rane) म्हणाले, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर उद्धव ठाकरे खोक्याचे आरोप करीत आहेत. पण माझ्याकडे पुराव्यानिशी 105 प्रकरणे आहेत, जी माणसं मातोश्रीवर पैसे घेऊन गेले त्यांची सर्वांची माहिती माझ्याकडे आहे. अभिनेता संजय दत्त मातोश्रीवर बॅग ओढत घेऊन गेला होता, संजय दत्त कसा आला? बॅग घेऊन गेटपासून बॅग ओढत ओढत घेऊन गेला ना? कोणत्या गेट मधून आला ते पण सांगू का? असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे.

Eknath Khadse : राजकारणातली मोठी चूक कोणती? नाथाभाऊंनी बेधडक सांगितलं

जी माणसं मातोश्रीवर पैसे घेऊन गेले त्यांची माहिती आहे. काही माणसं आता पण इथे आहेत. आता कोरोना काळात औषधांवर १५ टक्के कमिशन कोणी घेतले? सांगा नाहीतर मी सांगतो. एकनाथ शिंदेनी 40 आमदार पिकनिकला नेले, पण तुम्हाला सांभाळता आले नाहीत. खोक्यांचे आरोप काय करता? असा सवालही नारायण राणे(Narayan Rane) यांनी यावेळी केला आहे. तसेच आता एअर इंडियाबद्दल पण सांगतो. पावसकर सांगा, त्या उध्दव ठाकरेंना किती मिळायचे? एअर इंडियाचा मॅनेजर हरिहरन महिना 25 लाख द्यायचा उध्दव ठाकरेंना. लावा माझी चौकशी मी देतो उत्तर, असाही दुसरा गौप्यस्फोट नारायण राणे(Narayan Rane) यांनी केला आहे.

दरम्यान, आम्ही जेव्हा शिवसेना वाढवत होतो, तेव्हा उद्धव ठाकरे आठ वर्षांचा होता. उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत एकाही आंदोलनात भाग घेतला नाही, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा कधी दिल्या नाहीत, तो घाबरतो उच्चार स्पष्ट येईल की नाही, याची भीती असते. त्याकाळी शिवसेना आणि बाळासाहेबांविरोधात जो कोणी बोलेल त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्हाला झोप नसायची. आम्ही दोन दोन दिवस त्या माणसाच्या जिन्याखाली वाट पाहायचो. उद्धव ठाकरेनी कधी दोन तास तरी पाहिलीयं का? माझं तोंड उघडलं तर मातोश्रीची दार उघडणार नाहीत, असा सज्जड दमही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना भरला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज