सुषमा अंधारेंना नरेश म्हस्केंचे खुले आव्हान, आरोप सिद्ध करा नाहीतर….

Naresh Mhaske On Sushama Andhare : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेवरून राज्यसरकारवर टीका होत असतानाच आता उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना नेत्यावर मोठा आरोप केला आहे. खारघर येथील कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. उष्माघातामुळे आणि इतर गैरसोयींमुळे 100 लोकांचा बळी गेला असताना एक […]

Untitled Design (3)

Untitled Design (3)

Naresh Mhaske On Sushama Andhare : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेवरून राज्यसरकारवर टीका होत असतानाच आता उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना नेत्यावर मोठा आरोप केला आहे. खारघर येथील कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. उष्माघातामुळे आणि इतर गैरसोयींमुळे 100 लोकांचा बळी गेला असताना एक सदस्यीय समिती नेमली हे फडणवीस कोणत्या तोंडाने बोलत आहेत असा सवाल त्यांनी केला. तसेच, या कार्यक्रमासाठी सोईसुविधा देण्यासाठी ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले त्यावरही कारवाई करण्यात यावी. पण, त्या कंपनीमध्ये शिवसेना नेत्याची भागीदारी असल्यामुळे त्यावर कारवाई होणार नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारेंच्या आरोपाला उत्तर देताना शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणतात, अंधारेंना देव देवता, अध्यात्म याशी काही देणंघेणं नाही. कायम त्यांनी हिंदू देव देवतांची विटंबना केली आहे. तसेच त्या सध्या राजकारणासाठी श्रीसदस्य आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांना बदनाम करत आहेत. सुषमा अंधारेंचा स्वभाव म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल असा आहे. असा आरोप यावेळी नरेश म्हस्के यांनी केला.

Sangali : बाजार समितीची निवडणूक अन् जयंत पाटील कट्टर विरोधकासोबत…

कंपनीच्या कंत्राटावरून बोलताना नरेश म्हस्के यांनी सुषमा अंधारेंना सांगितले कि यामध्ये माझा कुठलाही सहभाग नाही. तुम्हाला जी माहिती दिली आहे ती चुकीची आहे. तुम्ही जे आरोप माझावर करत आहेत ते सिद्ध करून दाखवा या क्षणाला राजकारणातून निवृत्ती स्वीकारेल. नाहीतर तुम्हीं आणि तुम्हाला ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांनी निवृत्ती स्वीकारावी असे खुले आव्हान नरेश मस्के यांनी सुषमा अंधारेंना केले आहे.

Eknath Shinde : पुर्नविचार याचिका फेटाळली पण, मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध

लाईट अँड शेड ही कंपनी ठाण्यातील आहे. परंतु ही कंपनी कायम राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कामाचे आयोजन करत असते. त्यामुळे ही कंपनी नरेश म्हस्केची आहे का? हे तुम्ही त्यांना विचारा तुम्ही जर हे सर्व बोलत असला तर बोलवणारा दुसराच आहे हे नक्की असे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

Exit mobile version