Nashik MLC Election: राजकारणात उलटे फासे पडल्यानंतर धक्कादायक निकाल लागतात. असाच निकाल विधानपरिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाशिक मतदारसंघात (Nashik MLC Election) लागलाय. शिवसेनेचे अधिकृत नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्याकडे बहुमत असताना भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी त्याचा जोरदार पराभव केला आहे. दराडे यांचा पराभवामागे अनेक हात आहेत. त्यामुळे पुढच्या काळात नाशिकच्या राजकारणात आणखी धमाके होऊ शकतात.
सत्तेतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशा महायुतीकडे 468 पेक्षा जास्त मते होते. गोकुळ गीते यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नेत्यांनी त्यांना माघार घेण्यास सांगितले. परंतु माघारीचा मुदत कधीच संपल्याने मतपत्रिकेवर गोकुळ गीते नाव होते. नरेंद्र दराडे यांना आपला बाप काढला, असा आरोप गोकूळ गीते यांनी केला होता. त्यातून गीते यांना दराडे यांना धक्का दिला आहे. भाजपचे संकटमोचक, मंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी होती. दराडे यांचा पराभव झाल्यात माझ्यावर खापर फोडले जाईल, असे महाजन गीते बंधुंना सांगत होते. तसे झाले आहे.
ईडीकडून अटक, श्रीकांत शिंदेंची जवळीक ते एकनाथ शिंदेंचे मानसपूत्र ; आमदार सईद खान कोण आहेत ?
नाशिकचे राजकारण समजून घेतल्यास या मागे मोठी खळबळजनक गोष्ट आहे. 2018 मध्ये दराडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. 2018 विधानपरिषदेचे निवडणुकीत ते मोठी गेम खेळले होते. तत्कालीन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे सख्य नव्हते. दराडे यांनी एेवेळी शिवसेनेचे उमेदवारी मिळविली आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मते फोडून दराडे यांनी धक्कादायक विजय मिळविला होता.
2018 च्या निवडणुकीचा हिशोब चुकता
याच निकालाची पुनरावृत्ती आता भुजबळ यांच्या समर्थकांनी केलीय. दराडे व आमदार सुहास कांदे हे दोघे चांगले मित्र आहेत. शिवसेनेचे भिस्त या दोघांवर होती. स्थानिक राजकारणात दोन्ही नेत्यांना भुजबळ समर्थक पाण्यात पाहतात. त्यांना 2018 च्या निवडणुकाचा वचपा काढायचा होता. त्यामुळे ते या तयारीला लागले होते. शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेकडून गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण मात्र यश आले नाही. दराडे यांचा अर्ज भरण्याच्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते गैरहजर होते. तेव्हाच राष्ट्रवादीचे नेत्यांच्या मनात वेगळं काही आहे, असे वाटत होता. हा धोका खरा ठरला आहे. 2018 च्या निवडणुकीत नरेंद्र दराडे यांनी किंगमेकरची मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर आपले बंधू किशोर दराडे यांना आव्हानात्मक परिस्थितीत आमदार म्हणून निवडून आणले होते. हे दराडेंचे साम्राज्य भुजबळांनी खालसा करायचे होते.
दु:खद घटना! इमारतीला आग लागल्याने 15 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकांनी इमारतीवरुन मारल्या उड्या
गणेश गीतेंकडून छुपा प्रचार
नेत्यांच्या मनधरणीनंतर गोकुळ गीतने यांनी माघार घेतल्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात बंधू गणेश गीते व कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने प्रचार केला. गीतेंनी माघार घेतल्याने भाजपची मते आपल्याला मिळतील, असे दराडे यांना वाटत होते. पण भाजपच्या नेत्यांची नाराजी दराडेंना भोवली आहे. त्यांना साथ भुजबळ समर्थकांची मिळाली आहे. त्यातून दराडे यांचा मानहानीकारक पराभव झाला आहे.
राज्य सरकारने दबाव टाकला पण गीते बंधूंनी ताकद दाखवली
राज्यामध्ये महायुतीला 17 पैकी 16 जागा मिळाल्यात. नाशिकची हातची जागा गोकूळ गीते यांच्यामुळे गेली आहे. गणेश गीते हे नाशिकमधील राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. ते नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती होते. त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. म्हाडाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. या सूचना अशा पद्धतीने दिल्याने गीते बंधू हे बचावाच्या पवित्र्यात जातील, असे वाटत होते. पण भुजबळ समर्थकांनी त्यांना साथ दिली. या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादीची तब्बल 218 मते फुटली आहे. त्यामुळे शंभरहून अधिक मतांनी दराडे पराभूत झालेत. दराडेंनी निकालाचा वचपा काढण्याची भाषा केलेली आहे. नाशिकच्या राजकारणात सुहास कांदे शांत बसणारे नाहीत. दराडे व कांदे युती भुजबळसमोर नवे काही वाढवून ठेवू शकतात.
