Download App

Delhi elections : अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, २० जणाच्या यादीत एकही मंत्री स्टार प्रचारक नाही

अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली या यादीत अजित पवार, पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

  • Written By: Last Updated:

List of NCP star campaigners announced : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly elections) राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली. या निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पार्थ पवार आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

Ahilyanagar News : सिद्धटेकच्या विवादित जागेच्या अतिक्रमणावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा हातोडा… 

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये कोणाचा समावेश?

आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत २० जणांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, पार्थ पवार यांचेही नाव या यादीत आहे. या यादीत अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रिजमोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश आदिक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, वीरेंद्र सिंह, दीपाली अरोरा आणि इतर काही नेते समाविष्ट आहेत. हे सर्व नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाचे एकूण नऊ मंत्री आहेत, ज्यात आठ कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री आहे. असं असतांनाही दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार वगळता एकाही मंत्र्याचे नाव नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून (दि. १७ जानेवारी) सुरू होईल. उमेदवारांच्या अर्जांची छाननी १८ जानेवारी रोजी केली जाईल. तर उमेदवारांना २० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होईल.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीतही दिल्लीत पुन्हा एकदा भाजप आणि आप यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या विरोधात भाजपने अनेक प्रमुख चेहरे उतरवले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने माजी खासदार प्रवेश साहिब सिंग वर्मा यांना तिकीट दिले आहे. त्यामुळं भाजप अरविंद केजरीवाल यांना धक्का देऊन सरकार स्थापन करणार की, पुन्हा एकदा दिल्लीत आपचीच सत्ता येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

follow us