Ajit Pawar health update: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून ते सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यक्रम किंवा बैठकांना गैरहजर असल्याचं दिसलं. दरम्यान, डेंग्यूने त्रस्त असलेले अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत तपशील जाहीर केला. यात ते दिवाळीतील भेटीगाठींपासून लांबच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रश्मिका-कतरिनानंतर आता सारा तेंडुलकरच्या फोटोशी छेडछाड, फोटो व्हायरल
काही दिवसांपूर्वी डेग्यू झाल्यानं डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळंे ते सध्या विश्रांती घेत आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये पवार कुटुंबीय बारामतीत महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना भेटत असतात. मात्र, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने दिवाळीमध्ये नागरिकांना भेटू शकणार नसल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
अजित पवारांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूने आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारपणामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असं त्यांनी लिहिलं.
कार्तिकी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण फडणवीस-अजितदादांना नाही; मंदिर समितीचा निर्णय
त्यांनी पुढं लिहिलं की, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सगळ्यांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु, माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना प्रकाश, धनधान्याची समृध्दी, उत्तर आरोग्य देऊन येवो, अशी प्रार्थना करतो अशा दिवाळीच्या शुभेच्छाही अजितदादांनी दिल्या.
प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती…
राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी (२९) ट्विट करत सांगितलं होतं, की, अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याचं मीडियाकडून सांगण्यात येत आहे. मात्र काल त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाल्यावर पुन्हा आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने परततील.