Download App

शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपचे आमदार रडत होते…अजितदादांनी सांगितला ‘तो’ किस्सा

NCP Leader Ajit Pawar : शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे सगळ्यांना वाटत असताना अचानक एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. भाजपाकडे बहूम असतानाही शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपचे अनेक आमदार हे रडत होते. तसेच याबाबत तत्कालीन राज्यपाल हे देखील शॉक झाले, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहे.

अजित पवार हे साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले . यावेळी राज्यात आगामी मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार, तसेच आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार असा दावा पक्षातील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यावर पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.

यावर बोलताना पवार म्हणाले, असं काही नसत. मुळातच हे पोस्टरबाजी हे काही योग्य नाही. बहुमत गाठणे, मॅजिक फिगर मिळवणे हे सर्वात महत्वाचे असते. कोणालाही असे कधी वाटले होते का उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतं एकनाथ शिंदे या पदावर जातील. पण तसे झालेना.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत सुरत – गुवाहाटी करत परतले. यावेळी सगळ्यांना हेच वाटत होते की फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील व शिंदे हे उपमुख्यमंत्री बनतील. मात्र शिंदे मुख्यमंत्री पदी ऐकून राज्यपालांना देखील आश्चर्य वाटले. त्यांनी याबाबत मला बोलवून देखील दाखवले की हे असं कस झालं. भाजपात संख्याबळ असूनही शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार घेतल्याने भाजपचे आमदार रडू लागले त्यांना मोठं दुःख झालं. हे असं काही होईल हे भाजप आमदारांना देखील शॉकिंग होते.

सामना हे वर्तमानपत्र नसून ते तर शिवसेनेचं पॅम्प्लेट…मुनगंटीवारांचा खोचक टोला

म्हणून कोणीही बोलत असेल की आम्हाला याबाबत कल्पना होती, माहिती होती असं म्हणत असेल तर हे सगळं खोटं आहे. असं काही होईल याबाबत कोणालाही काही एक माहिती नव्हतं, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारच्या शपथविधीचा तो किस्सा पत्रकार परिषदेत सांगितला.

Tags

follow us