महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; जयंत पाटलांना विश्वास

Jayant Patil On CM Post : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP)आणि महाराष्ट्राचं (Maharashtra) आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात कुठे अजित पवार (Ajit Pawar), कधी सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर कधी […]

Jayant Patil

Jayant Patil

Jayant Patil On CM Post : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP)आणि महाराष्ट्राचं (Maharashtra) आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात कुठे अजित पवार (Ajit Pawar), कधी सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर कधी जयंत पाटील (Jayant Patil)यांच्या नावानं भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Market Committee Election : आजही बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी अन् निकालही जाहीर होणार

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. हे सर्व सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार आहे.

महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच होणार असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं आता सर्वांनी मान्य केलं आहे.

आगामी काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे येईल असाही विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. त्यांनी कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

Exit mobile version