Jayant Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रात येत आहेत. आज दुपारी साईनगरी शिर्डीत मोदींचे आगमन होणार आहे. येथे मोदी विविध विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच शेतकरी मेळाव्यालाही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. पाटील यांनी एक ट्विट केले आहे. ‘मोदीजी आपण फीत कापून खुशाल श्रेय घ्या, नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबणार आहे. यातच आमचा खरा आनंद सामावलेला आहे’, असा टोला पाटील यांनी लगावला.
‘पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकासकामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे, याचा मला आनंद होत आहे. 1970 ते 2019 पर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सुमारे 1100 कोटी रुपये खर्च करून केवळ 45 टक्के काम पूर्ण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे 900 कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे 90 टक्के काम पूर्ण केले.’
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार… pic.twitter.com/1KCNFybuIG
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 26, 2023
‘या प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मी स्वतः या कामाची तीनदा पाहणी केली. महाविकास आघाडीतील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातले. कोरोनाच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता मात्र त्या परिस्थितीतही आम्ही विकासकामे थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवल्याचे पाटील यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण, आमच्या शेतकरी बांधवांना माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे’, असे पाटील यांनी म्हटले आहे.
मोदींच्या हस्ते निळवंडेच्या कालव्याचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येणार आहेत. अनेक विकास कामांचे उद्घाटन तसेच विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे. मोदी हे शिर्डी येथे येणार असल्याने शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे. पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत येणार आहेत. दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार यावेळी निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल.
PM Modi : साईंच्या दर्शनापासून गोव्याला रवाना होईपर्यंत असा असणार मोदींचा नगर दौरा