राष्ट्रवादी सोडणार? शिरसाटांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी खरं सांगून टाकलं

Jayant Patil On Sanjay Shirsat : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) राष्ट्रवादीत (NCP)राहणार नाहीत, ते भाजपच्या (BJP)वाटेवर असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी केला होता. त्यावर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय शिरसाट यांच्यापेक्षा क्रेडिबिलिटी(Credibility) जरा जास्त असेल नाही का? तुम्ही त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर […]

Jayant Patil Sanjay Shirsat

Jayant Patil Sanjay Shirsat

Jayant Patil On Sanjay Shirsat : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) राष्ट्रवादीत (NCP)राहणार नाहीत, ते भाजपच्या (BJP)वाटेवर असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी केला होता. त्यावर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय शिरसाट यांच्यापेक्षा क्रेडिबिलिटी(Credibility) जरा जास्त असेल नाही का? तुम्ही त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर माझी प्रतिक्रिया विचारता म्हणजे जरा… आपण पुढे जाऊया असं म्हणत त्यांनी मिष्किलपणे या विषयावर बोलणे टाळले. (ncp-leader-jayant-patil-criticize-sanjay-shirsat)

SIT चौकशीतून अनेक…; फडणवीसांच्या सूचक विधानावर ठाकरेंना फुटला घाम 

या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, संजय शिरसाट यांच्यापेक्षा माझी क्रेडीबीलिटी जरा जास्त असेल नाही का? त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर माझी प्रतिक्रिया विचारता म्हणजे जरा पुढे जाऊया असं म्हणून मिश्किलपणे हसून त्यावर बोलणं जयंत पाटील यांनी टाळल्याचे पाहायला मिळाले.

‘बावनकुळे म्हणजे कंस मामा, आता त्यांनी रावणाचं रुप घेतलं’; भाच्यानेच केली आगपाखड

जयंत पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात जे सर्वे छापून येत आहेत, त्यामध्ये काही तथ्य दिसत नाही, कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष स्तरावर काही निवडक मतदारसंघाचे सर्वे केले आहेत, त्यामध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे अतिशय बळकट असल्याचे चित्र आहे, त्यामुळे काही असत्यावर आधारीत सर्वेच्या बातम्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहेत, याविषयी चर्चा निघाली त्यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या काही भागातील सर्वेंची माहिती मी पक्षातील सर्व विधिमंडळ सदस्यांना अवगत करुन दिली. त्याचा निष्कर्ष एकच आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा महाराष्ट्रातील मोठा पक्ष आणि लोकांचा अधिक पाठिंबा असणारा पक्ष म्हणून पुढे येत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्रातल्या काही भागात हे आमदार येणार ते आमदार नाही येणार, असे जे सांगण्यात आलेले आहे, नेमके तिथलेच सर्वेची माहिती देण्याचा प्रयत्न मी केला, की जिथे आमचे तिथले आमदार फार कंफर्टेबल सुरक्षित परिस्थितीत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

त्याचवेळी पत्रकारांनी जयंत पाटील यांना विचारले की, संजय शिरसाट म्हणाले की, जयंत पाटील हे राष्ट्रवादीत राहणार नाहीत, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, संजय शिरसाट यांच्यापेक्षा माझी क्रेडीबीलिटी जरा जास्त असेल नाही का? त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर माझी प्रतिक्रिया विचारता म्हणजे जरा पुढे जाऊया असं म्हणून मिश्किलपणे हसून त्यावर बोलणं जयंत पाटील यांनी टाळल्याचे पाहायला मिळाले.

त्याचवेळी पत्रकारांनी विचारले की, विधानपरिशदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस दावा सांगणार का? त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आमची त्याच्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. त्याचवेळी पत्रकारांनी जागावाटपाबद्दल प्रश्न विचारला त्यावर पाटील म्हणाले की, जागा वाटपाची चर्चा सहकारी पक्षांशी करु त्यावेळी करु पण माध्यमांतून त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

पत्रकारांनी विचारले की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही, त्यावर जयंत पाटील म्हणाले की, सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला काही रस नाही, त्यांनी तो करावा नाही करावा, तो त्यांचा अधिकार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जे योग्य सोयीचं वाटतं ते त्यांनी करावं, असंही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसने गद्दार दिन आंदोलनाचा कार्यक्रम केला. मुंबईमध्ये प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर मेहबूब शेख यांनीही आंदोलनाची तयारी केली होती. पण पोलिसांनी आंदोलन होऊ नये यासाठी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना सकाळीच ताब्यात घेतले आणि दिवसभर त्यांना बसवून ठेवले, महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यालाही परवानगी नाही आणि कोणीही सरकारविरोधात बोलू नये, अशी मानसिकता ठेवून पोलिसांचा वापर अशी आंदोलनं चिरडण्यासाठी सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

Exit mobile version