Download App

चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून शीतल म्हात्रेंचा खास शैलीत समाचार !

  • Written By: Last Updated:

Rohini Khadse On Sheetal Mhatre : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला आता शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी एकनाथ खडसे (Rohini Khadse) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहिणी खडसे यांनी म्हात्रे (Sheetal Mhatre) यांची भीडभाडच ठेवलेली नाही. शीतल म्हात्रे आपले चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव. चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा ! असे शब्द खडसे यांनी म्हात्रेंसाठी वापरले आहे.

विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले

रोहिणी खडसे यांनी ट्वीट करून म्हात्रेंचा जोरदार समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले शीतल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारल्याची झलकच दाखवून दिली आहे. सुप्रियाताईंबद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही. परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते, असा टोलाही रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.

Ayodhya Railway Station : राम मंदिराप्रमाणेच भव्य असणारं अयोध्या स्टेशन कसं आहे? LetsUpp Marathi

शितल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रिया ताई सुळे यांच्यावर टीका करायची. तुम्ही स्वकर्तुत्वाने आमदार होऊन दाखवा आधी. त्यांना संसदरत्न, संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत. राहिला प्रश्न वांग्याचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा , RTI टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा. चौकशी लागेल म्हणून स्व पक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रे बाईने सुप्रियाताई सुळे यांच्यावर बोलणे म्हणजे शिंदळ बाईने सावित्रीवर चिखल उडवण्यासारखे आहे, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

शीतल म्हात्रे आपले चिचुंद्रीसारखे तोंड बंद ठेव. सुप्रियाताईंवर टीका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशा इशाराही रोहिणी खडसे यांनी दिलाय. चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा…असेही रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्सवर म्हटले आहे.

follow us