Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती येथील वक्तव्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्या वक्तव्यावर सातारा येथे स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) थेट ठणकावले आहे. ते म्हणाले की अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. त्यांनी संधी मागू देखील नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. आता अजित पवार यांना पुन्हा संधी नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
ते पुढं म्हणाले की प्रश्न असा आहे की एकदा, दोनदा एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली असेल. तेव्हा व्यक्तीला आम्ही एक संधी दिली होती. पहाटेच्या शपतविधी वेळी आम्ही आधी निर्णय घेतला होता. पण त्यानंतर ते झालं ते योग्य झालं नाही, आमच्याकडून योग्य काम झालं नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना एक संधी होती. पण संधी ही नेहमी मागायची नसते. आता आमची भूमिका वेगळी आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘अजित पवार आमचे नेते’ या वक्तव्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार आमचे नेते असं मी म्हणालो नाही. सुप्रिया अजित पवारांना नेते म्हणाली होती. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. त्यांच्यामुळे बहिण भावांच्या नात्यात बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
अजितदादा आमचे नेते आहेत असं म्हणालोच नाही; पवारांचं काही तासातचं घुमजाव
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील फुटीबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत मोठं वक्तव्य केले होते. शरद पवार म्हणाले की लोकशाहीत पक्षाचे नेते वेगळी भूमिका घेऊ शकतात. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आहे, त्याला फुटीर म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी बारामती येथे दिली होती.