Mla Jitendra Awhad : राज्याला हादरुन टाकणाऱ्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरण चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. या हत्याकांड प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या नाव पुढे येत आहे. सीआयडीकडून वाल्मिक कराड याला अटक झाल्याचंही सांगण्यात येतंय. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर ताशेरे ओढले आहेत.
देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय टीका; अजित पवारांच्या सूचक मौनाचा अर्थ काय?
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच अनेक मोठ्यांची नावे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वाल्या कराड आहे. तो सराईत आहे, तो कधीही पोलिसांना खो देऊ शकतो. या प्रकरणात मोठी नावे असल्याने पोलिस प्रशासन दबावाखाली असणार आहेत. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली आणि पक्षाची अद्याप भूमिका मांडलेली नाही. ते अद्याप या प्रकरणावर बोललेले देखील नाहीत. त्यामुळे अजित पवार पाठिशी घालत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.
एका लाडक्या बहिणीने भावाची इज्जत तारली, तर दुसरीने वेशीवर टांगली ; घनश्यामचा निक्कीला टोला
फडणवीसांकडून राजव्यवस्था पायाखाली घालण्याचा प्रयत्न…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर न्यायालयीने चौकशीबाबत भाष्य केलं होतं. फडणवीस तुम्ही विधानसभेत जे काही बोलतात तुम्हाला आता आम्ही पुन्हा विधानसभा सुरु होईल तेव्हाच प्रश्न विचारणार आहोत. तोपर्यंत या प्रकरणाचं काय होईल माहिती नाही. बीडसह परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार होती, काय झालं. फडणवीस आपल्या पायाखाली राज्यव्यवस्था घालत असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय.
सीआयडी चौकशीत सिलेक्टिव नावंच बाहेर काढत आहेत. कोणत्याही स्त्रीचं नाव तुम्ही जाणूनबुजून का बाहेर काढत आहेत. जिथे गुप्तता पाळायची तिथं तुम्ही गुप्तता पाळता. चौकशीच्या नावांमध्ये नाही पाळत. या प्रकरणात ज्याचा संबंध आहे त्याला तुम्ही समोर आणा. संपूर्ण बीडला माहितीये की हे प्रकरण कोणी केलंय. रामकृष्ण बांगरला बोलवा आणि जनतेत सुनावणी घ्या. बीडमध्ये जे चालू आहे वंजारी, वंजारी हे जे काय झालंय ते चुकीचं आहे वंजारी बदनाम होतोयं. हा लढा माणुसकीसाठी आहेॉ, संतोष देशुमख तुमची लाडकी बहीण नाही का? असा थेट सवालही जितेंद्र आव्हाडांनी केलायं.