Download App

दादा जिथे आम्ही तिथे…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा

Ncp MLA Support Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या पक्षात अस्वस्थ आहे. तर लवकरच भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी अजित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दादा जिथं आम्ही तिथं असं म्हणत या आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसेच पवार हे भाजपासोबत गेले तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार असे हे आमदार म्हणाले आहे. यामुळे अजित पवारांची भाजपासोबतच्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहे अशा चर्चा समोर आल्या आहेत. यातच भाजपचे नेतेमंडळी देखील कोणी आमच्या सोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत एक प्रकारे या बातम्यांना हवा देत आहे. यातच अजित पवार आणि या विषयावर कोणतेही भाष्य केले नाही आहे. मात्र सध्या राजकीय वर्तुळात याच चर्चा रंगू लागल्या आहेत.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी अजित पवार यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे आहे. यावेळी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले, अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांनी आपल्याला मुंबईला बोलवलं आहे. दादा जो काही निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल. मुंबईत जाऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतर जो निर्णय ते घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं अण्णा बनसोडे म्हणाले.

मोठी बातमी : बंडासाठी अजित पवारांकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार?

आमदार कोकाटे म्हणाले…
सिन्ररचे आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले, अजित दादा भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही पक्षासोबत आणि दादासोबत जाणार. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काही निर्णय घेईल, असं वाटत नाही. सर्व परिस्थिती ही कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे, असे सूचक वक्तव्य कोकाटे यांनी केले आहे.

Tags

follow us