Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) नॅचरल करप्ट पार्टी म्हणत सिंचन आणि बँक घोटाळ्यांचा उल्लेख केला होता. त्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रमक होत महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी सोमवारी (18 सप्टेंबर) केली होती. एकप्रकारे त्यांनी या माध्यमातून भाजपला (BJP) आव्हानच दिले होते. या घडामोडींवर भाष्य करत अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आलेलं नैराश्य अद्यापही दूर झालेलं दिसत नाही. याबाबत चौकशी पूर्ण झाली असून न्यायालयाचे निर्णयही आले आहेत. वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशा प्रकारची वक्तव्ये येतात. हे वक्तव्य नक्कीच टाळता आलं असतं. अजितदादांनी घेतलेल्या निर्णयामागे सगळा महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यही अजितदादांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे आम्ही जो निर्णय घेतला (Maharashtra Politics) त्याला नक्कीच समर्थन मिळत आहे, असे तटकरे म्हणाले.
वाद चिघळला! Canada कडून ट्रॅव्हल अॅडव्हायजरी; भारतातील असुरक्षित राज्यांचा केला उल्लेख
खासदार सुळे पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हणाल्या होत्या, की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा त्याला आम्ही 100 टक्के पाठिंबा देऊ. मोदी जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरल करप्ट पार्टी म्हटलं होतं. तसेच त्यांनी दोन घोटाळ्यांचाही उल्लेख केला होता. एक म्हणज सिंचन आणि दुसरा बँक घोटाळा. मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करते की पंतप्रधान मोदींची इच्छा जी इच्छा आहे ती पूर्ण करा. तुम्ही जो भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता कृपया त्याची चौकशी करा. फक्त दोनच नाही तर आणखीही घोटाळ आहेत. संसदेत माझे 800 भाऊ आहेत. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराबाबत जी तळमळ आहे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात जे काही करायचं आहे त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहू, असे खासदार सुळे म्हणाल्या होत्या.