Download App

खरी राष्ट्रवादी कुणाची ? कागदपत्रे सादर करा; निवडणूक आयोगाची दोन्ही पवारांना नोटीस

  • Written By: Last Updated:

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हे बंड करून सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची यावरून वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष व चिन्हावर दावा ठोकला आहे. अजित पवार गटाने हा वाद भारतीय निवडणूक आयोगाकडे नेला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवार व शरद पवार यांना नोटीस काढली आहे. दोघांनीही तीन आठवड्यांमध्ये पक्षाबाबतची कागदपत्रे सादर करावीत, असे निवडणूक आयोगाने नोटीसांमध्ये म्हटले आहे. (ncp political crisis election commission of india issue notice ajit pawar and sharad-pawar)

शिवाजी पार्कवरचा तो संच पूर्णपणे नेस्तनाबूत झाला; शिरीष कणेकरांच्या जाण्याने संजय मोने व्यथित

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांबरोबर पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल हे गेले आहेत. अजित पवार गटाकडे चाळीस आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला अजित पवारांकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दिसून येत आहेत. तर शरद पवारांकडे तेरा आमदार आहेत.

राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गटाने लगेच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आमच्याकडे चाळीस आमदार आणि खासदारांचा पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्रही निवडणूक आयोगाला सादर केले आहे. आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्षाचे चिन्ह व पक्ष आम्हाला मिळावा, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

अजित पवारांसोबत पहिली टीम गेली, दुसरीही लवकरच जाणार! राज ठाकरेंचा पुन्हा दावा

त्यानंतर आता निवडणूक आयोगाने आपली कार्यवाही सुरू केलेली आहे. दोन्ही गटाला आता पक्षाबाबतचे पुरावे म्हणजेच कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये निवडणूक आयोगात जोरदार संघर्ष होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही पक्षाबाबतचे कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर शिंदे यांना पक्ष व चिन्ह देण्याचा निर्णय झाला होता.

Tags

follow us